DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अखेर 12 वीच्या निकालाची तारीख जाहीर, बोर्डाकडून 4 नव्या वेबसाईट जारी

मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे  सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वीचा निकाल ३ ऑगस्ट रोजी लागणार आहे.

महाराष्ट्रात बारावीचा निकाल कधी लागणार यासंबंधीची घोषणा करण्यात आली आहे. दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात येणार आहे. 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्त्येकी 30 टक्के वेटेज आहे. तसंच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा, असायमेन्टस यांना 40 टक्के वेटेज असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे.

 

निकाल पाहण्यासाठी या संकेतस्थळांना भेट द्या

1. https://hscresult.11 thadmission.org.in

 

2. https://msbshse.co.in

 

3. hscresult.mkcl.org

 

4. mahresult.nic.in. 

 

 

www.mahresult.nic.inhttps://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

 

तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

 

असे मिळणार गुण

2021 मध्ये आयोजित करण्यात आलेली 12वीची परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आली होती. त्यामुळे मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व 10 वीमध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, 11 वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व 12 वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच 12वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे 12 वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. सदर गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.