DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

अमळनेर तालुक्यात असंघटित कामगारांच्या ई-श्रम कार्ड ची झाली उच्चांकी नोंदणी

भाजप नेते स्व.उदय वाघांच्या जयंतीपासून सुरू झाला उपक्रम,मोफत कार्डचेही सुरू झालं वितरण

(अमळनेर प्रतिनिधी:- नूर खान) भाजपाचे दिवंगत नेते स्व.उदय वाघ यांच्या जयंती निमित्ताने दि.22 डिसेंबर 2021 पासून असंघटित क्षेत्रातील कामगारांचे मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी अभियान अमळनेर तालुक्यात सुरू झाले असताना या अभियानामुळे सुमारे 5 हजारांच्या वर उच्चांकी नोंदणी तालुक्यात झाली असून नोंदणीनंतर शहरासह गावोगावी या कार्डचे मोफत वितरण देखील माजी आ.स्मिताताई वाघ यांच्या हस्ते सुरू झाले आहे .
विशेष म्हणजे या अभियानानंतर्गत ग्रामिण जनतेसाठी गावोगावी कॅम्प लावण्यासह महिला भगिनींपर्यंत स्वतः पोहोचून नोंदणी करून घेतल्याने तालुक्यात महिला कामगारांची नोंदणी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. माजी आ.स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली व भाजयुमो प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे नोंदणी अभियान दि 22 डिसेंबर पासून अमळनेर येथील स्व.उदय वाघ यांच्या स्मारकस्थळा पासून सुरू झाले होते. स्व.उदय वाघ यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कामगार बांधवांच्या हितासाठी नेहमीच योगदान दिले असून शासनाच्या माध्यमातून कामगार बांधवाना जास्तीतजास्त योजनांचा लाभ कसा मिळेल यासाठी कसोशीने प्रयत्न केले आहेत,यामुळेच त्यांना श्रद्धांजली म्हणून कामगार हिताचे हे अभियान भैरवी वाघ यांनी स्वखर्चाने अतिशय मोठ्या प्रमाणात राबविले.
ई-श्रम ही ही केंद्र शासनाची योजना असून यामाध्यमातून सीएससी ई-श्रम वर 38 कोटी संघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी केली जाणार आहे,असंघटित क्षेत्रातील कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस देखील यातून तयार केला जाणार आहे.या योजनेचा लाभ अमळनेर तालुक्यातील जास्तीतजास्त कामगार बांधवाना मिळवून देण्यासाठी भाजयुमो प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे यांनी मोठे परिश्रम घेऊन उच्चांकी नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करून दाखविले आहे,विशेष म्हणजे या नोंदणी साठी बाहेर किमान 100 रुपये खर्च येत असताना त्यांनी कोणाकडूनही कोणतीही फी न घेता स्वखर्चाने हे अभियान राबविले.

कामगार बंधूंचे हित हाच प्रामाणिक उद्देश-भैरवी वाघ पलांडे अभियानाच्या सुरवातीला शहरात मोठा कॅम्प लावला असता शहरी कामगारांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता,मात्र त्यावेळी जे कामगार वेळेअभावी पोहचू शकले नाहीत त्यांच्यासाठी शहरात प्रभागनिहाय कॅम्प लावण्यात आले,त्यानंतर ग्रामिण भागात कॅम्प लावले गेले,महिला भगिनींपर्यंत तर आम्ही स्वतः पोहोचून नोंदणी करून घेतली,बघता बघता सुमारे 5 हजारांच्या वर कामगार बंधू आणि माता भगिनींची नोंदणी यात झाली असून या अभियानामुळे कदाचित परिसरातील तालुके आणि जिल्ह्यात अमळनेर तालुका अव्वल असावा असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.प्रत्यक्षात स्पर्धा करणे किंवा प्रसिद्धी मिळवणे हा या अभियानाचा उद्देश मुळीच नसून केवळ आमचा एकही कामगार बंधू सदर योजनेपासून वंचित राहू नये हाच आमचा प्रयत्न असल्याची भावना भैरवी वाघ पलांडे यांनी व्यक्त केली आहे.तसेच आता नोंदणी केलेल्या बांधवांचे कार्ड देखील उपलब्ध झाल्याने त्याचे वितरण देखील माजी आ स्मिता ताई वाघ यांच्या हस्ते सुरू केले असून ज्यांनी ज्यांनी नोंदणी केली असेल त्यां सर्वाना टप्याटप्याने कार्ड दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्ड पासून कुणीही वंचित राहू नका,,, या कार्ड ची नोंदणी असणाऱ्या असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे,सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कार्यशक्तीचा मागोवा घेऊन त्यांच्या क्षमतेप्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे.हे एवढेच नव्हे हे कार्ड तयार केल्यास सरकार असंघटित कामगारांना एक वर्षासाठी विमा मोफत देणार आहे,तसेच सरकारला असंघटित कामगारांसाठी धोरण व कार्यक्रम राबविण्यात मदत होणार असून असंघटित कामगारांसाठी सरकारच्या माध्यमातून अनेक योजना व संधी उपलब्ध होण्याचे संकेत मिळाले असल्याची माहिती भैरवी वाघ पलांडे यांनी देऊन अजूनही ज्यांची नोंदणी राहिली असेल त्यानी आमच्याशी संपर्क साधून आवर्जून करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.