DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आजचे राशीभविष्य – ०२ ऑगस्ट २०२१

मेष – एका चांगल्या प्रोजेक्टवर काम कराल. मित्रांची मदत होईल. मित्र, कुटुंबासोबत वेळ घालवाल. अचानक लहान-मोठा फायदा होऊ शकतो. पैशांबाबत चिंता राहील. काही कामं अपूर्ण राहू शकतात किंवा कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. खांद्यावर असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकालं.

वृषभ – चांगली बातमी तुमच्या कानावर येईल. तुमच्यासाठी घेतले गेलेले निर्णय योग्य ठरु शकतात. काम करण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो. विचार केलेली कामं पूर्ण कराल. अचानक धन लाभ होवू शकतो.

मिथुन – स्वतःसाठी वेळ काढा. नोकरी, करियर बदलण्याचा विचार करु शकता. काहीतरी वेगळं, हटके करण्याची इच्छा असेल. मित्रांसोबत वेळ घालवू शकता. अधिकतर वेळ एकट्यात जाऊ शकतो. चांगली बातमी कानावर येईल.

कर्क – तुमच्या इच्छेनुसार कामं करा. महत्त्वाचं काम करण्याकडे तुमचं लक्ष राहील. गुंतवणूक करण्याचा विचार कराल. नुकसान होण्याची शक्यता आहे. काही गोष्टींमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. करियर, गुंतवणूक याबाबत निर्णय घेण्यासाठी दिवस योग्य नाही.

सिंह – विचार करुन पुढे जाल, त्यामुळे यश मिळेल. विचार केलेली कामं पूर्ण होतील. मोठा निर्णय घेताना त्रास होऊ शकतो. जवळपासच्या लोकांमुळेही त्रास होण्याची शक्यता आहे.

कन्या – तुमचे विचार योग्यरित्या मांडून परिस्थिती बदलण्यास मदत होऊ शकते. स्थिरता, सुरक्षितता जाणवेल. कामासाठी अधिक वेळ द्यावा लागेल. जबाबदारीची कामं लक्षपूर्वक आणि सावधपणे करा. कामात कमी जाणवेल. तब्येतीची काळजी घ्या.

तुळ – भांडण, गैरसमज होण्याची शक्यता आहे. महत्त्वकांक्षी आणि उत्साही राहाल. समजदारीने यश मिळेल. महत्त्वाच्या कामांकडे लक्ष द्या. विचार करुनच तुमचं म्हणणं इतरांसमोर मांडा.

वृश्चिक – चांगली बातमी मिळू शकते. येणाऱ्या दिवसांत फायदा होण्याची शक्यता आहे. स्वत:साठी वेळ काढा. जुन्या गोष्टींवर विचार करु नका. येणाऱ्या दिवसांची चिंता राहील. व्यवहारात सावध राहा.

धनु – चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. स्वत:साठी काय योग्य असेल हे समजण्याचा प्रयत्न करा. धीर ठेवा. पैशांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मनातील गोष्ट कोणाशीही शेअर करु नका. मोठ्या कामासाठी दिवस चांगला नाही. नवीन कामाची सुरुवात करु नका. विचार करुनच कामं करा.

मकर – विचार करुनच पुढे जा. पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. घर-वाहन खरेदी करु शकता. नवीन ओळखी होऊ शकतात. लोकांचं तुमच्याकडे लक्ष राहील. कोणताही निर्णय घेताना विचार करा, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. वाद न करता काम करण्याचा प्रयत्न करा.

कुंभ – अधिक मेहनत करावी लागू शकते. महत्त्वपूर्ण गोष्टींवर नवीन योजना आखू शकता. दिवस ठिक आहे. विचाराधिन असलेली कामं पूर्ण होऊ शकतात.

मीन – परिवार आणि मित्रांसोबत दिवस चांगला जाईल. तुमच्या विचारांचा, पद्धतीचा वापर केल्यास सफलता मिळेल. अनेक समस्यांवर मार्ग मिळू शकतो. कोणाच्याही कामात अडसर आणू नका. पैशांबाबत चिंता राहील.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.