DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आदर्श शेतकरी पुत्र प्रा.डॉ सुनील पाटील यांनी लिहला गावाचा इतिहास

आ.अनिल पाटलांच्या हस्ते प्रकाशन…

अमळनेर :- तालुक्यातील शिरुड येथील प्रगतिशील आदर्श शेतकरी भालेराव उत्तम पाटील यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रा.डॉ सुनील भालेराव पाटील विभाग प्रमुख सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ वसंतराव नाईक कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शहादा यांनी लिखित ‘माझ गाव माझा इतिहास’ या पुस्तकाचे प्रकाशन गुढीपाडवाच्या पार्श्वभूमीवर गावात कार्यक्रम घेऊन शिरूड ग्रामपंचायत या ठिकाणी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

 

ज्या गावात आपण लहानाचे मोठे झालो आपली जन्मभूमी अशा गावासाठी काहीतरी वेगळे करावे नोकरी निमित्त बाहेरगावी राहिल्याने गावची माहिती लिहिण्याचे धाडस त्यांनी केले. आहे गावाचे नाव लौकिक व्हावे. महान कार्याचा विसर पडू नये तसेच नवीन पिढीला त्याच्या कार्याची माहिती व्हावी. भूतकाळातील घडलेल्या घटनांचा संदर्भ लक्षात घेण्यासाठी गावाचा इतिहास काय? काळाच्या पडद्याआड गेलेले घटना मांडून आपलाच गौरवशाली इतिहास ‘माझं गाव माझा इतिहास’ या पुस्तकाच्या माध्यमातून समाजापुढे ठेवण्याचा हेतू प्रा. डॉ. सुनिल पाटील यांनी केला आहे.
आमदार अनिल पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करत मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी पं.स माजी सभापती शाम अहिरे, मा.प्राचार्य.डॉ वसंत देसले, प्राचार्य डॉ.विलास सोनवणे कृ.उ.बा.स ताईसो तिलोत्तम पाटील, किसान कॉग्रेस ता.अध्यक्ष प्रा.सुभाष पाटील,
सरपंच गोविंदा सोनवणे,
उपसरपंच कल्याणी पाटील, पो.पा विश्वास महाजन, पोपट बारकू, प्रफुल्ल पाटील,योजना पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिकांची उपस्थिती होती. ‘माझं गाव माझा इतिहास’ पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न करण्यात आला.

साने गुरुजी प्रसारण मंडळ अमळनेर येथील शिक्षक डी. ए. धनगर सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व प्रा. डॉ. सुनील पाटील यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.