DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

‘आमचा २५ वर्षांचा संसार मोडला, मात्र प्रेम अद्यापही कायम’ : गिरीश महाजनांची कबुली

जळगाव : प्रतिनिधी 

सोमवार रोजी शिवसेनेच्या दोन दिग्गज नेत्यांच्या घरी लग्न सोहळा पार पडला. खासदार संजय राऊत हे वधूपित्याच्या भुमिकेत तर मंत्री गुलाबराव पाटील हे वरपिता होते. शिवसेना नेते आणि उपनेत्यांच्या घरील या दोन्ही सोहळ्यांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. अनेक सर्वपक्षीय नेते एकत्र समोरासमोर आल्याने काही मनातल्या आणि काही आठवणीतील गोष्टी नेत्यांच्या तोंडून बाहेर आल्या.

जळगावमध्ये गुलाबराव पाटील यांचा मुलगा विक्रम यांच्या लग्नाला राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादासाहेब भुसे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, युवासेना सचिव वरूण सरदेसाई, भाजप आमदार आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार, खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी वधूवरांना आशीर्वाद देताना अनेकांनी मनोगत व्यक्त केले. त्यावेळी गिरीश महाजन यांनी बोलताना आमचा २५ वर्षांचा संसार मोडला असला तरी आद्यपही प्रेम कायम असल्याची जाहीर कबुलीच देवून टाकली.

महाजन म्हणाले, वरपिता गुलाबराव पाटील आमचे जुने मित्र आहेत. त्यांनी आणि आम्ही तब्बल २५ वर्षे संसार केला पण जयवंतराव तुम्ही तो मोडला. पण आता संसार मोडला असला तरी आमचे शिवसेनेवर आजही प्रेम कायम आहे. महाजन यांच्या या जाहीर कबुलीनंतर उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.