DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

एकनाथ खडसेंच्या जावयाचा जामीन ईडीने फेटाळला

मुंबई : राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांचा जामीन सेशन कोर्टाने फेटाळला आहे. भोसरी भूखंड प्रकरणात खडसे यांचे जावई गिरीश यांना ईडी ने अटक केलेले आहे, या पार्श्वभूमीवर आज न्यायालयात जामीन अर्ज साठी विनंती करण्यात आली होती मात्र सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर जामीन नाकारण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिले आहे.

2 ऑगस्ट रोजी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला, मुक्ताईनगर सह जळगाव जिल्ह्यात संपूर्ण शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर झाला, त्यांची देखील ईडी चौकशी सुरू असताना जावई गिरीश चौधरी यांच्या जामीन अर्जासाठी साठी विनंती करण्यात आली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

 

गिरीश चौधरी यांनी भोसरी येथील एमआयडीसीचा भूखंड खरेदी करताना रक्कम कुठून आणली यासंदर्भात ईडीचा अद्यापपर्यंत तपास सुरू आहे. 31 कोटीची मालमत्ता असताना तीन कोटी मध्ये कशी खरेदी करण्यात आली याचादेखील तपास ईडी करीत आहे, जावई यांचा जामीन नाकारल्याने खडसे यांच्या चिंतेत आणखी भर पडलेली आहे. वाढदिवसा निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये जोश भरतांना खडसेंच्या परिवारा भोवतीच अडचणीची भर पडली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.