एस टि कर्मचाऱ्यांच्या संपाला संभाजी ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा –
अमळनेर:- एस.टी.महामंडळ कर्मचारी संघटनेच्या सुरू असलेल्या संप व आंदोलनास म.से.स. व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.यावेळी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक शाम पाटील यांनी एस.टी.कर्मचाऱ्यांची भेट घेतली.तसेच संपाला पाठिंबा देऊन सविस्तर चर्चा केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहनमंत्री अनिल परब यांनी लवकरात लवकर या संपावर तोडगा काढावा यासाठी संभाजी ब्रिगेड प्रयत्न करणार असल्याचे शाम पाटील यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत किरण पाटील, अक्षय चव्हाण, तेजस पवार, अमोल पाटील, दर्पण वाघ, विशाल पाटील, उज्वल मोरे, तेजस वानखेडे, राहूल पाटील, आदी उपस्थित होते.