DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

किशोर निंबाळकर यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई : वृत्तसंस्था 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदावर किशोर राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी संदर्भातील अधिसूचना काढली आहे. ६ वर्षांसाठी त्यांची नियुक्ती केल्याचे अधिसूचनेत नमूद केले आहे.
अध्यक्ष पदाचा प्रश्न लालफितीत
महाराष्ट्र शासनात अनेक विभागांत मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. ही भरती करण्यासाठी सरकारकडून ‘एमपीएससी’ला परवानगी दिली जाते. एकीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांचा घोळ सुरू असताना, अध्यक्ष नियुक्तीचा प्रश्न लालफितीमध्ये अडकलेला होता. त्यामुळे उमेदवारांच्या परीक्षांचा प्रश्न रखडला होता.
आंदोलनाचे लोण राज्यभर
कोरोनामुळे आधीच परीक्षा लांबल्याने विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. राज्यभरात याचे लोण पसरले. विरोधकांनी राजकीय मुद्दा बनवत, सत्ताधाऱ्यांना घेरले. राज्य विधानसभेच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी १५ हजार रिक्त जागा एमपीएससी मार्फत भरण्याचा निर्णय घेतला. मात्र पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या भरती प्रक्रियेतील मुलाखती किंवा शारीरिक चाचणी घेण्यासाठी अध्यक्ष विभागाला नव्हता. राज्य शासनाने ही बाब विचारात घेत, किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीची दारे उघडी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.