कृष्णा कौतिक भिल यांची पोलिस आयुक्तकड़े तक्रर सदर आरोपीवर कलम 326 लावण्यात यावी
अमळनेर (प्रतिनिधी नूर खान) येथील तांबेपुर भागातील कृष्णा कौतिक भिल यांनी प्रत्यक्ष पोलिस स्टेशनला हजर होऊन दि.१८/०१/२०२२ रोजी आरोपी प्रविण उर्फ पिंटू सरदार साळुखे रा. सानेनगर, तांबेपुरा, अमळनेर या विराध्द फिर्याद दिली होती.पोलिसानी सदर फिर्याद लिहून घेतली त्यात कृष्ण कौतिक भील यांच्या डावा पायावर पावडीने मार लागल्यामुळे फ्रेंक्चर झाले आहे. अमळनेर येथील सुयश हॉस्पिटल येथे उपचार घेतले असून डॉक्टरानी मला पायाला पाटा दिलेला आहे व तो पाटा सुमारे ४५ दिवसापेक्षा अधिक राहणार आहे. तसेच मला वेदना होऊ नये म्हणून डॉक्टरांनी काही औषधे दिलेली आहेत. त्यामुळे मी माझे रोजचे काम करता येगेय शक्य नाही व त्यामुळे मला ४५ दिवसापेक्षा अधिक काळ शारीरिक देदना सहन कराव्या, लागणार आहेत .व सदर दुखापली मुळे माझ्या जीवितास सुध्दा धोका होऊ शकला असता .सदर दुखापत ही आरोपी- प्रविण उर्फ पिंटू सरदार साळुखे याने पावडीने मारहाण केल्यामुळे…(घातक हत्यारामुळे ) झाली आहे. त्या आरोपी वर कलम ३२६ साहला घातक हत्यारांनी किंवा साधनांनी हल्ल्याचे हत्यार म्हणून वापरले असता…. असा स्पष्ट उल्लेख आहे. सदर आरोपी याने पावडीने मारहाण केल्यामुळे,गमबीर दुखापत झाल्यामुळे भा.द.वि.कलम ३२८ प्रथमदर्शनी लागू होते. तरी सदर कलम-३२६ लावून आरोपीस योग्य कटोर शिक्षा हावी ही विनंती त्यासाठी अमळनेर पो.स्टे. प्रभारी यांना योग्य त्या सूचना व आदेश करावेत . सदरचा आरोपी हा मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई आहे व तो आडदांड व खुनशी प्रवृत्तीचा आहे. मला मारहाण केल्यानंतर त्याने दि.२०/०१/२०२१ रोजी मी ज्यांच्या शेतात मजुरी काम करतो त्या धनराज मधुकर पाटील यांना देखील सदर मी केलेली केस मागे घेण्याबाब्त जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यावरून आपल्या अदखलपात्र अपराध दाखल आहे. सदर आरोपी हा आमच्या घरी येऊन केस मागे घेण्याबाबत धमकी देऊन गेला आहे. त्याबाबत मोबाईल मध्ये विडीओ रेकॉटिग आहे. तसेच सदर आरोपी हा वेगवेगळ्या लोकांना घरी पाठवून आमच्यावर दबाव वापरत आहे. तसेच आमच्यावर व माझ्या मालकावर अॅट्रोसिटीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहे. मी पोलीस मध्ये आहे. माझे कोणीच काही कस शकत नाही मला कोणी फाशी देणार नाही. एकेकाला पाहून धेईल, असे म्हणून केस मागे घ्या, नाहीतर विचार करा अशी धमकी देकना तो निघून गेला. सदर आरोपी- प्रविण उर्फ पिटू सरदार साळुखे हा मुंबई पोलिस दलात काळाचौकी पो स्टे सेन्ट्रल रिजन मुंबईला असून त्याने कायदा माहित असून देखील गंभीर स्वरूपाचा अपराध केला आहे. त्यामुळे त्याचे विरुध्द गुन्ह्याचे स्वरूप लक्षात येता.मा द.वि.कलम-३२६ लावण्यात याव..