DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

खूशखबर! ‘आयडीबीआय’ बॅंकेत इतक्या जागांसाठी मोठी भरती

नवी दिल्ली : कोरोनाच्य काळात अनेक सरकारी तसेच खाजगी नोकरी भरती प्रक्रिया बंद होत्या. परंतु आता कोरोनाची परिस्थिती हळुहळु निवळू लागल्याने भरती प्रक्रियेलाही वेग आला आहे. त्यातच आता आयडीबीआय बॅंकेने कार्यकारी पदासाठी मोठी भरती काढली आहे. निवड झालेल्या उमेदवाराला महिन्याला 29 हजार रूपये पगार मिळणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची मुदत 18 ऑगस्ट पर्यंत देण्यात आली आहे.

उमेदवारांनासाठी अर्ज सादर करण्याची सुरूवात 4 ऑगस्ट पासून सरू होत आहे. तर 18 ऑगस्ट हा अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असेल. कार्यकारी भरती 920 जागांसाठी राबवण्यात येत आहे. पात्र ठरलेले उमेदवार आयडीबीआय बॅंकेच्या अधिकृत वेबसाईट जाऊन अर्ज दाखल करू शकता.

आयडीबीआय बॅंके कार्यकारी पदासाठी कार्यकारी पदासाठीची पात्रता निश्चित केली आहे. यासाठी उमेदवारांचे वय हे 20 ते 25 च्या दरम्यान असणे आवश्वक आहे. तर भारत सरकारने मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठातून उमेदवारांनी 55 टक्के सह पदवी मिळवणे आवश्यक आहे. तर, आरक्षित जाती, जमातीसाठी गुणांची टक्केवारी ही 50 टक्के ठेवली आहे.

दरम्यान, या पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना अर्जाचे शुल्क 200 रुपये ठेवलं आहे. तर इतर प्रवर्गातील उमेदवारांनासाठा 1000 रुपये इतकं अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. बॅंकमध्ये कार्यकारी हे पद फक्त एका वर्षांसाठी निश्चित केलं आहे. तर उमेदवारांच्या कामगिरीवर त्यांचा पुढील कार्यकाळ वाढवला जाईल, अशी माहिती आयडीबीआय बॅंकने जारी केलेल्या आदेश पत्रात सांगितले आहे. या भरतीची अधिक माहिती आयडीबीआय बॅंकेच्या idbibank.in या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.