DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

गणेश उत्सहा निमित्त चिंचोली पिंप्री येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

चिंचोली पिप्री / प्रतिनिधी- विश्वनाथ शिंदे दिनांक 07/09/2022 रोजी चिंचोली पिंप्री येथील श्री विठ्ठल रुख्मीनी मंदीर येथे श्री गणेश उत्सहा निमित्त गावातील 32 पुरुष व 4 महिलांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबीराचे आयोजन आदर्श गावातील माजी सरपंच विनोद दगडु चौधरी ,त्यांचे लहान बंधू डॉ. संजीव दगडु चौधरी, यांनी केले . या वेळी जळगाव येथील रेड कॉस मार्फत रक्त संकलन केले गेले असून रक्तदान हेच श्रेष्ठदान असल्यामुळे गावातील रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे कौतुक केले जात आहे . याठिकाणी उपस्थित गावाचे पो. पाटील वसंत लोखंडे तसेच त्यांच्या पत्नी, ग्रामपंचायत सदस्य संदीप साळवे, पत्रकार विनोद सोमवंशी, अमोल सपाटे ,निखिल पाटील,सिमा बाई, संजीव चौधरी,अजय गायकवाड ,यांनी रक्तदान शिबीरात रक्तदान केले असून सर्व रक्तदात्यांना सर्टिफिकेट देण्यात आले तसेच त्यांचा सन्मान करण्यात आला.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.