DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

ग्रामपंचायत वाकी खुर्द येथे लोकनियुक्त सरपंचाकडून आरोग्य तपासणी शिबीराचा कार्यक्रम संपन्न

जामनेर/उपसंपादक -शांताराम झाल्टे जामनेर शहरातील वाकी खुर्द या गावी लोकनियुक्त सरपंचाकडून आज रोजी 15 वा वित आयोग सन 2020=21 व2021=22 अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामधे 50 वर्षावरील नागरिकांचे डोळे तपासणी केली असून दि.11/09/2022 रोजी रविवारी सकाळी 11=00 वाजता तज्ञ डॉक्टर डॉ . निलेश पाटील एम एस नेत्र रोग तज्ञ डाॅक्टरांनी यांनी आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी केली. आरोग्य शिबीराचे ठिकाण . ग्रामपंचायत कार्यलया समोर संभा मंडप मध्ये घेण्यात आले . यावेळी वाकी खु. चे लोकनियुक्त सरपंच श्री . सुधाकर गंगाराम सुरवाडे यांच्या हस्ते डॉ निलेश पाटील यांचा सत्कार फुल गुच्छ शाल देऊन करण्यात आला. कार्यक्रमा ठिकाणी उपस्थित उपसरपंच सौ .आरती शिवाजी तेली , सदस्य सौ कविता संदिप झलवार , सदस्य सौ राधा विनोद सरताळे ,व सौ पुनम योगेश ढाकरे, सदस्य श्री ईश्वर बाबुलाल तेली, बापु लक्ष्मण पाटील,श्री . प्रकाश सांडु सुरळकर, ग्रामशेवक आर . पी . बोडखे ,शिपाई प्रदिप सरताळे ,पा. पु अजय पंचोळे , व कामगार विनोद तेली आदी गावातील ग्रामस्थ , जेष्ट नागरिक होते. नेत्र तपासणी चा लाभ 118 व्यक्तीनी घेतलेला असता कार्य क्रमात सर्वांना ग्रामपंचायत तर्फे फ्रि मध्ये चेष्मा देण्यात आले. गावातील सर्व माता पिता आणि नागरिकांमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.