DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण आले समोर; वाचून बसेल धक्का

दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क । सीडीएस जनरल बिपिन रावत हे हेलिकॉप्टर अपघातात शहिद झाले होते. या अपघाताबाबत वेगवेगळे तर्क मांडण्यात येत होते. त्यामुळे हा अपघात नक्की कसा झाला याची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या अपघाताच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ इन्क्वायरीच्या अहवालातून मोठा खुलासा झाला आहे.

सीडीएस हेलिकॉप्टर क्रॅश होण्यामागे खराब हवामान हे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या समितीने आपला अहवाल पूर्ण केला आहे. तसेच तो कायदेशीर सल्ल्यासाठी कायदेशीर शाखेकडे पाठवण्यात आला आहे. लवकरच हा अहवाल हवाईदल प्रमुखांना सादर केला जाणार आहे.

या अहवालाबाबत हवाई दलाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. असे असले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या कारणाचा शोध घेणाऱ्या समितीला असे आढळून आले आहे की, खराब हवामानामुळे वैमानिकांची दिशाभूल झाली असावी. ज्यामुळे हा अपघात झाला.

याला तांत्रिक भाषेत त्याला CFIT म्हणजेच ‘Controlled Flight Into Terrain’ म्हणतात. हवाई दलाच्या प्रशिक्षण कमांडचे कमांडिंग-इन-चीफ एअर मार्शल मानवेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्रालयाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.

सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण १४ जणांचा या अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रश्न उपस्थित केला जात आहे की, अखेर हवाई दलाचे ‘एमआय-१७ व्ही ५’ हेलिकॉप्टर कसे कोसळले? या अपघाताची चौकशी करण्यासाठी हवाई दलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीची स्थापना केली होती, जेणेकरून अपघाताचे कारण स्पष्टपणे कळू शकेल.

चौकशी समितीने हवाई दल आणि लष्कराच्या संबंधित अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. यासोबतच त्यांनी या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या स्थानिक लोकांशीही चर्चा केली आहे. अपघातापूर्वी ज्या मोबाईलवरून व्हिडिओ शूट करण्यात आला होता, त्याचीही चौकशी करण्यात आली आहे.

अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा एफडीआर म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर म्हणजेच ब्लॅक बॉक्सही जप्त करण्यात आला आहे. त्याचा डेटाही अहवालात समाविष्ट करण्यात आला आहे. ८ डिसेंबर रोजी सीडीएस जनरल बिपीन रावत तामिळनाडूतील सुलूर हवाई तळावरून हेलिकॉप्टरमधून उटीजवळील वेलिंग्टनमधील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ एका ठिकाणी भेट देण्यासाठी जात होते. त्यादरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.

Divyasarthi News WhatsApp Group