DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जामनेर येथील ज्ञानगंगा माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवली शालेय संसद निवडणूक प्रक्रिया

जामनेर : उपसंपादक-शांताराम झाल्टे

जामनेर – ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जामनेर ता. जामनेर, जि. जळगाव या प्रशालेत शालेय जीवनापासून लोकशाही मुल्ये अवगत होऊन लोकशाही शासन पद्धतीची माहिती मिळावी, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया समजावी, अनुभवता यावी या उद्देशाने शालेय विद्यार्थी संसद निवडणूक प्रक्रिया गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आली. नागरिकशास्त्र हा विषय शिकवत असताना विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत व इतर निवडणुका, त्यांचा प्रचार बघितला आहे, पण मतदान कसे करतात. गुप्त मतदान पद्धत काय असते? हे प्रत्यक्ष अनुभवण्याची ईच्छा विद्यार्थ्यांनी श्री. योगेश बावस्कर सरांकडे व्यक्त केली. प्रत्यक्ष निवडणुक प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजण्यासाठी प्राचार्य श्री. सोनवणे सर यांनी सुद्धा उपक्रमशील शिक्षक योगेश बावस्कर सर यांना सदर उपक्रमास परवानगी दिली.
विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे, चिन्ह निवडणे, प्रचार करणे, मतदान करणे, मतमोजणी करणे याचा प्रत्यक्ष कृतीतून अनुभव घेतला. विद्यार्थ्यांमधून उमेदवार म्हणून पायल ईश्वर चव्हाण, वैष्णवी योगेश गोसावी, मयुरी ज्ञानेश्वर सपकाळ, वैभव रविंद्र भोई, वैभव अशोक भराडी, जितू रविंद्र कंडारे, धिरज राजू नेरकर, ओम रतिलाल वाघ यांनी उमेदवारी केली.

केंद्र अध्यक्ष म्हणून अविनाश सुभाष ब्राह्मणे ,मतदान अधिकारी १- राधेश्याम नाईक, मतदान अधिकारी २- मनीष नाईक, मतदान अधिकारी ३ – जयश्री राठोड, तर पोलिंग एजेंट म्हणून अल्केश राठोड, गौरव कोळी, अंकुश जाधव, ज्ञानेश्वर नाईक, बी एल ओ म्हणून नाजुका कुंभार यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. हे सर्व कामकाज विद्यार्थ्यांनी यशस्वीपने पार पाडून उत्स्फुर्तपणे या संपूर्ण प्रक्रियेत सहभाग घेतला.
यात ओम रतिलाल वाघ व मयुरी ज्ञानेश्वर सपकाळ हे उमेदवार निवडून आले.

सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी योगेश बावस्कर सर यांनी परिश्रम घेतले. तर उपक्रम पार पाडण्यासाठी विनय खंडे, विजय कोळी, विलास पाटील, अनिल देशमुख, रुपेश शिरसागर, मनीषा भारंबे, स्नेहल पाटील, वंदना उंबरकर रोहिणी पाटील, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

*संचालक मंडळ व महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर. जे. सोनवणे सर यांनी उपक्रमशिल शिक्षक श्री. योगेश बावस्कर सर यांचे कौतूक करून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.