DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जामनेर शहरात घरगुती गॅसचा होतोय काळा बाजार

हा काळाबाजार थांबविण्यासाठी पुरवठा विभाग लक्ष देईल का?

जामनेर | शांताराम झाल्टे, उपसंपादक

शहरात घरगुती वापराच्या गॅसचा मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पणे वापर होत असून सदर चा गॅस हा काली पिली तसेच गॅस वर चालणाऱ्या वाहनांमध्ये सर्रास पणे भरला जात आहे. अवैधपणे गॅस भरणारे तथाकथित गुंड दादागिरी प्रवृत्तीचे असून आम्ही तर पोलिसांना हफ्ते देतो, त्यामुळे आमचे कोण वाकडे करणार ? असा तोरा मिरवतात.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामनेर शहरात गॅस पंप नाही. त्यामुळे घरगुती गॅस हंड्यांचा वापर गॅस किट वाहनांमध्ये सर्रासपणे करण्यात येत आहे. तर यामागील गौडबंगाल काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणची चौकशी होऊन संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सुज्ञ नागरिकांमध्ये होत आहे. तर अवैध गॅस भरणारे नामक व्यक्ती दादागिरीने सांगतो की, मी तर पोलिसांना हफ्ते देतो. माझा व्ययसाय अवैध असला तरी कोण बंद करणार ?यांच्या डोक्यावर हात कोनाचा आहे असे दिसून येत आहे.
दरम्यान सदर घरगुती गॅस चा काळा बाजार रोखण्यासाठी पुरवठा विभाग व पोलीस विभागाकडून संयुक्तपणे कारवाई करून घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार थांबवावा. याप्रकारचा काळाबाजार थांबवण्यासाठी आमजनतेमधून मागणी केली जात आहे.
व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा अशी सुद्धा मागणी आहे.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.