DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

जिल्ह्यात रविवारपर्यंत अवकाळी पाऊस शक्य

अरबी समुद्रावर कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम

जळगाव : प्रतिनिधी

जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली असून, त्यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली आहे. अरबी समुद्रावर गाेवा किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने १९ ते २१ नाेव्हेंबरदरम्यान जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या दाेन दिवसांमध्ये जिल्ह्यात तुरळक पावसाने हजेरी लावली.

 

अाठवड्यापासून राज्यात विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली अाहे. बुधवारी जिल्ह्यात काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. गुरुवारी जळगाव शहरात रिमझिम पाऊस झाला. दिवसभर वातावरण ढगाळ झाल्याने किमान तापमानदेखील १४ अंशांवरून २० अंश सेल्सिअसपर्यंत पाेहाेचले हाेते. त्यामुळे हवेतील गारठादेखील कमी झाला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवार, शनिवार आणि रविवारी जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. साेमवारपासून वातावरण निरभ्र हाेईल असा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. त्यात वाऱ्याचा वेगही ताशी १२ किलाेमीटरपर्यंत वाढू शकताे, असे हवामान विभागाने नमूद केले आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.