DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

दीपावली निमित्त आजी माजी सैनिकांनी घेतली मॅरेथॉन स्पर्धा.. मॅरेथॉन स्पर्धेत तरुणाई धावली

रजनीकांत पाटील

अमळनेर :- दिवाळी म्हटले की सुट्टी सर्व जणांना गावी येण्याची ओढ लागते. जेणे करून आपला आनंद आपल्या पूर्ण परिवारास सोबत साजरी व्हावा. तालुक्यातील शिरूड येथे यावेळी एक वेगळ्याच पद्धतीमध्ये दिवाळी साजरा करण्यात आली. ती म्हणजे आजी माजी सैनिकांच्या सानिध्यात दिवाळी पार्श्वभूमीवर देश सेवा करणारे सैनिक सुट्टीवर आल्याने
आजी-माजी सैनिक यांनी एकत्र येऊन रॉयल फौजी ग्रुप यांनी गावात दि.५ रोजी दिवाळी निमित्त मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील ३०८ स्पर्धक सहभागी झाले होते.
सदर स्पर्धेत पूर्णपणे नियमांचे पालन करण्यात आले असून डॉ. हेमंत कदम यांनी स्पर्धकांची आरोग्य चाचणी करत मोफत ऍम्बुलन्स सेवा पुरवली.

 

स्पर्धेला सकाळी ठीक ७:३० स्पर्धकांना सर्व सूचना डी ए धनगर यांनी दिल्या. हिरवे झेंडे दाखवत राष्ट्रीय खेळाडू एस.पी वाघ, सर्व फौजी मान्यवर व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेवेळी स्वयंसेवक जागोजागी बंदोबस्तात होते. स्पर्धा ७ कि.मी एवढी असून शिरूड ते मंगरूळ पासून परतिच्या मार्गी या पद्धतीमध्ये होती.

सदर स्पर्धेत धडगाव येथील भगतसिंग वळवी याने २० मिनिटे ४४ सेकंदात ७ की.मी टप्पा गाठून प्रथम क्रमांक मिळवला असून ५००१ रुपयांचे बक्षीस प्राप्त केले. तर दांभरूड जि. औरंगाबाद येथील कुलदीप चव्हाण द्वितीय क्रमांक मिळवून ४००१ रुपये, तर नाशिक येथील दिनकर लिलके तृतीय क्रमांक मिळवून ३००१ रुपये, उत्तेजनार्थ विलास चव्हाण २००१ रुपये व मोहन गिऱ्हे १००१ रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तसेच उत्कृष्टपणे धावणाऱ्या उर्वरित ६ ते २०पर्यंतच्या स्पर्धकांना देखील प्रत्येकी ५०० रुपये व मेडल्स देण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील आजी माजी सैनिक पण नागरिकांची उपस्थित होती.
अतिशय निपक्षपाती स्पर्धा पार पाडण्यात आली. कोरोनांनंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात स्पर्धेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.