DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

धक्कादायक….सुरतमध्ये गॅसगळती, 6 जणांचा मृत्यू..

गुजरातमधील सुरत येथे एक मोठी दुर्घटना घडली. शहरातील सचिन परिसरात केमिकलने भरलेल्या टँकरमधून वायु गळती होऊन 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेत 20 हून अधिक मजूर अत्यवस्थ असून सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केलं गेलं आहे.

गुजरातमधील सचिन परिसरात असलेल्या विश्व प्रेम डाईंग प्रिटिंग मिलजवळ टँकरमधून ही गॅस गळती झाल्याने गिरणीतील 6 कामगारांचा मृत्यू झाला आहे. 20 हून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक आहे, याबाबतची माहिती रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉक्टर ओमकार चौधरी यांनी दिली.

कंपनीजवळ असणाऱ्या नाल्यात टँकरमधून रसायन टाकले जात असताना हा अपघात झाल्याची माहीती आहे. सध्या 8 जण व्हेंटिलेटरवर असल्याचंही समजतंय. एक टँकर चालक नाल्यात विषारी रसायन टाकत होता. यादरम्यान त्यातून विषारी वायूची गळती सुरू झाली. जवळच असणारे मिलमधील कर्मचाऱी या विषारी वायूच्या संपर्कात आले.

याआधीही गुजरामधील अहमदाबादमध्ये कपड्याचा कारखान्यात टाकी साफ करत असताना चार कामगाराचा मृत्यू झाला होता. आता सध्याच्या दुर्घटनेमुळे या मिलमधील कर्मचाऱ्यांची परिस्थिती चिंतादायक असून श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचार सुरू आहेत.

सध्या या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरु केले आहे. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत गॅस गळती कशामुळे झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. तरी मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.