DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

ना.गिरिशभाऊ महाजन यांच्या आशीर्वादाने श्री.महेंन्द्र बाविस्कर यांची जामनेर नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदी बिनविरोध निवड

उपनगराध्यक्ष पदी नियुक्ती होताच पहीला प्रश्न अतिक्रमण चा घेतला हाती-मा.महेंन्द्र बाविस्कर

जामनेर/उपसंपादक -शांताराम झाल्टे
आज दि १२ सप्टेंबर २०२२ रोजी जामनेर नगरिचे ना.गिरिशभाऊ महाजन यांच्या असिम कृपेमुळे माळी समाजामध्ये प्रसिद्ध असलेले सर्वांचे आवडते मा. महेंद्र (नाना)बाविस्कर यांची एक हाती बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की मा.महेंद्र बाविस्कर हे भाजप पक्षाचे कट्टर कार्यकर्ते असून ग्रामविकासमंत्री गिरिषभाऊंच्या आशिर्वादामुळे आज ते फळ महेंद्र (नाना)बाविस्कर यांना लाभलेले आहे.
या सभेत यावेळी नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार श्री.अरूण शेवाळे व सहाय्यक निवडणूक अधिकारी नगरपालिका मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या वतीने नाना बाविस्कर यांची उपनगराध्यक्ष पदी एकहाती बिनविरोध निवड या ठिकाणी केलेली आहे.
उपनगराध्यक्ष पदासाठी बाविस्कर यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला असून,या निवड अर्जावर सूचक नगरसेवक आतिष झाल्टे व नगरसेवक रिजवान शेख यांच्या सह्यांची मान्यता मिळाल्याने बिनविरोध नियुक्ती नाना बाविस्कर यांची करण्यात आली.
यावेळी जामनेर नगरीत उपनगराध्यक्ष पद हाती घेताच अतिक्रमण धारकांचा प्रश्न मी मार्गी लावणार व त्यांना न्याय मिळवून देईल असे शूभ कामाचा विडा नाना बाविस्कर यांनी उचललेला आहे.
या नियुक्ती ठिकाणी उपस्थित सर्व नगरसेवक-नगरसेविका, आणि कर्मचारी उपस्थित होते.तसेच नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन यांनी नवनिर्वाचित झालेले उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.याच प्रमाणे
नगरपालिका सभागृहात उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी उपनगराध्यक्ष श्री.महेंन्द्र बाविस्कर यांचे स्वागत करून त्यांची नाचून फटाक्यांच्या सहाय्याने व गुलाल उधळीत मिरवणूक काढली या मिरवणुकीत नाना बाविस्कर यांनी आनंदाच्या उत्सहात ढोल ताशे,डीजेच्या तालावर ठेका घेतला जणू आज माळी समाजात जामनेर येथे दिवाळी साजरी करण्यात आली.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.