DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पाचोरा रोड येथील सिद्धिविनायक गणपती रिक्षास्टाॅप यांच्या वतीने सालाबादप्रमाणे महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न.

जामनेर/उपसंपादक -शांताराम झाल्टे जामनेर शहरातील सिद्धिविनायक गणपती पाचोरा रोड रिक्षास्टाॅप यांच्या वतीने सालाबादप्रमाणे गेले १५वर्षापासून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून याठिकाणी अनेक गणेश भक्ताचे अनमोल सहकार्य लाभण्यात आले आहे. पाचोरा रोड जवळील सिद्धिविनायक गणपती मंदिर हे जागृत देवस्थान मानले जात असल्याने येथे मोठ्या संख्येने गणेश भक्तगण जमतात व दरवर्षी महाप्रसादाचा कार्यक्रम पार पाडत असतात. याठिकाणी सिद्धिविनायक गणेश मंडळांचे आयोजक जवाहर शेठ,अनिल बोहरा,अध्यक्ष संतोष रामदास झाल्टे, उपाध्यक्ष बाळू प्रल्हाद माळी, खजिनदार संजय रामदास झाल्टे, युवराज झाल्टे गोविंदा पांडुरंग कापडे, विलास चवरे, गजानन चौधरी, समाधान माळी, सोपान माळी, रवी माळी,शंकर माळी,शेनफडू माळी, ईश्वर माळी, नारायण शिंदे,विलास भोई, ईश्वर कापसे,विरू राजपूत, ईश्वर भोई,मोती राणा,आदी गणेश भक्तांची उपस्थिती असून वाकी येथील गेल्या पंधरा वर्षांपासून रिक्षा चालक असणारे लोकनियुक्त सरपंच सुधाकर गंगाराम सुरवाडे यांच्या हस्ते प्रत्येक वर्षी अनमोल असे उत्कृष्ट सहकार्य त्यांच्या हातून घडून येत आहे. यावेळी पुढील जीवनात माझ्या हातून असेच शुभ कार्य घडून येवो हिच मागणी गणपती बाप्पा जवळ नतमस्तक होऊन सरपंचानी आपली मनोकामना या वेळेस केली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.