DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पाचोऱ्यात जिल्हा बँक निवडणुकीसाठी ९३.९८ टक्के मतदान

पाचोरा  | प्रतिनिधी
जे. डी‌. सी. सी. बॅंकेच्या निवडणूकीसाठी पाचोरा येथे श्री. गो. से‌. हायस्कूल येथे एका बुथवर १८३ पैकी १७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत एकुण ९३.९८ टक्के मतदान शांततेत पार पडले. निवडणूक केंद्रावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ, शिवसेनेचे आमदार किशोर पाटील, भाजपाचे सतिष शिंदे यांनी भेटी दिल्या. विशेष म्हणजे या निवडणुकीत भटक्या विमुक्त जाती जमाती मतदार संघातून पाचोरा तालुक्यातीलच महाआघाडी तर्फे मेहतापसिंग रामशिंग नाईक (गाळण) व विकास वाघ (पाचोरा) हे दोन्ही उमेदवार एकाच तालुक्यातील ऐकमेका विरोधात उभे होते. यापूर्वी पाचोरा तालुक्यातून वि.का. सोसायटी मतदार संघातून आमदार किशोर पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत. विकास वाघ अथवा मेहतापशिंग नाईक या पैकी कोणीही एक उमेदवार निवडून येणार असल्याने पाचोरा तालुक्यातील दोन सदस्य जिल्हा बँकेत प्रतिनिधी करणार आहे. मतदानाला सकाळी आठ वाजता सुरवात झाल्यानंतर आज विवाहाची मोठी तिथी असल्याने सकाळी आठ ते दहा वाजता केवळ १३.६६ टक्के, दहा ते बारा वाजता ४८.६३ टक्के, दुपारी बारा ते दोन वाजता ८९.८३ टक्के तर दोन ते चारच्या दरम्यान ९३.९८ टक्के मतदान झाले. मतदान अधिकारी विजय काळे, भागवत पाटील, मिलिंद नेहते, व्ही. एन. देशमुख यांनी काम पाहिले.

 

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.