DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

पाचोऱ्यात शिवसेनेला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

पाचोरा | प्रतिनिधी 

भाजपाने एका पाठो-पाठ एक शिवसेनेला धक्का द्यायला सुरुवात केली आहे. भाजपाने पाचोरा शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रं.४ व ५ मध्येच सुरुंग लावला. येथील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे.

काही दिवसापूर्वी एकमेव पंचायत समिती सदस्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत शेकडो कार्यकर्त्यांसमवेत आ.गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसांपासून शहरात शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाचे अनेक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत होत्या.

आता प्रत्यक्षात भाजपाने पाचोरा शहरातील शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभाग क्रं.४ व ५ मध्येच सुरुंग लावला असून येथील सर्वच्या सर्व कट्टर शिवसैनिक यांनी शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र करत भाजपाच्या अमोल शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्याशी चर्चा केली असता शिवसेनेमधील वाढती घुसमटता व आमदार किशोर पाटील हे जनतेचे व कार्यकर्त्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यात असमर्थ ठरत असल्याचे सांगून शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र करत असल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.