DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

बोरी धरणाचे पंधरा दरवाजे उघडले

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अमळनेर | प्रतिनिधी

बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झालेला असल्याने धरणात 100% पाणीसाठा झालेला आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने धरणाचे सुरक्षितेच्या दृष्टीने पुराचे  पाणी नदी पात्रातील विसर्ग जास्त  वाढण्याची शक्यता आहे.

 

बोरी धरणाची सध्याची पाणी पातळी 267.10 मीटर असून सध्या रात्री 9.15 वा धरणाचे  15 दरवाजे 0.30 मीटरने उघडून 13543 कयुसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरु आहे.

बोरी धरणाचे खालील बोरी नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून बोरी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. कृपया जीवित वा वित्त हाणी टाळण्याचे दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यात यावी असे आवाहन तहसील दार मिलिंद वाघ यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.