भयमुक्त परीक्षेचा भीतीयुक्त प्रवास..परीक्षेचा ध्यास रोखतो आहे विद्यार्थ्यांचा श्वास..
राज्यात दहावी आणि बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन होणार आहे. राज्य मंडळ ऑफलाइन परिक्षांवर ठाम असून ११ फेबुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षेकरिता लागणारे साहित्य जिल्हा केंद्रावरून वाटपाला सुरुवात होणार आहे.
बुधवारी राज्य शिक्षण मंडळाची विभागीय मंडळांसोबत ऑनलाइन बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार ७५ टक्के अभ्यासक्रमावर लेखी, तर ४० टक्के अभ्यासक्रमावर प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षा पुढे ढकला अन्यथा ऑनलाइन घ्या’, म्हणत काही दिवसांपूर्वी विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. यानंतर ऑनलाईन परीक्षा घ्यावी असा एक मतप्रवाह तयार झाला होता. मात्र, यावर बोर्डाने ऑफलाईन परीक्षा घेण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.
याच बाबतचा विषयावर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील व्ही.झेड. पाटील हायस्कूल येथील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी दै. लोकशाही बोलताना आपापले मत व्यक्त केले आहे. एक विद्यार्थ्याने सांगितले की परीक्षा ऑफलाईन घेणेच योग्य तर त्याच वर्गाती दुसऱ्या विद्यार्थिनीने सांगितले की तर परीक्षा ऑफलाईन घेणे चुकीचे परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीनेच झाली पाहिजे असे सांगितले
दोघांचा मतप्रवाह काय
परीक्षा ऑफलाईन घेणे योग्य- कल्पेश पाटील
तर इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थी कल्पेश पाटील यांनी सांगितले की माझे वैयक्तिक मत असे आहे की दहावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच झाली पाहिजे परीक्षा म्हणजे आपले मूल्यमापन व मूल्यमापन हे ऑनलाईन परीक्षेने होईल असे मला वाटत नाही. कारण कोरोना काळात ऑनलाइन अभ्यासक्रम व काही अभ्यासक्रम ऑफलाईन पद्धतीने झाला आहे. सोबत स्वयंअध्ययन आहे. तरी ऑफलाइन परीक्षा देण्यास काही अडचण येणार नाही कोरणा प्रादुर्भाव लक्षात घेता. आपण परीक्षेवेळी आपण आपली काळजी घेत मास्क, सॅनिटायजर व सोशल डिस्टंसिंगचे पालन केले तर काही अडचण येईल असे मला वाटत नाही.
तर परीक्षा ऑनलाईनच घेतली पाहीजे – कोमल दहिभाते
तर इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी कोमल दहिभाते ईने सांगितले परीक्षा ऑफलाईनचा शिक्षण मंत्री यांनी घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण सध्याच्या स्थितीत कमी जास्त होत असते. जर पुन्हा ऐन परीक्षेच्या वेळी जर पुन्हा कोरणाचा प्रादुर्भाव वाढला तर किंवा परीक्षेच्या वेळी एखादा विद्यार्थ्याला कोरोना झाला तर तो विद्यार्थी परीक्षा कशी देणार? याबाबतचा शिक्षणमंत्र्यांनी कोणतेही निर्देश दिले नाहीत. अशा स्थितीत त्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान देखील होऊ शकते. जर परीक्षाकाळात विद्यार्थ्याला कोरोना झाला तर विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने पेपर देऊ शकतो. त्यामुळे त्याचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही.