महावितरणाच्या वीज रोहित्राला वेलींचा वेढा..
अमळनेर :- शिरूड येथील महावितरणच्या वीज रोहितला वेलींनी गुंफण घालत चांगलाच विळखा घातल्याचे चित्र दिसत आहे. या ठिकाणी वीज चालू बंद करण्यासाठी त्या रोहित्राचा वापर नेहमी होत असतो. मात्र सतत त्या ठिकाणी येण्या जाण्यास नेहमी अडचण होत असते.
रोहित्र बंद अथवा चालू करण्यासाठी पुरेसा हात देखील त्या ठिकाणी पोहोचायला अडचण येत असते. तसेच गावातील ग्रामपंचायत शिपाई त्या ठिकाणी रोहित्र बंद चालू करण्यासाठी नेहमी ये-जा करत असतात. रोहित्राच्या चहूबाजूला पूर्णपणे घाणीचे साम्राज्य असून रोहितत्राच्या चहूबाजूंनी पूर्णपणे वरपर्यंत वेलींचा सर चालतच आहे. त्या ठिकाणी पूर्णपणे वेलींनी विळखा घालून अर्ध रोहित्र वेलींनी बुजले गेले दिसत आहे.
तरी या रोहित्रावर बऱ्याच वेळा लाईट ट्रीप होत असते. बऱ्याच जागी रोहित्र जळून देखील गेले आहे. त्या ठिकाणी नेहमी चिंग्या उडत बारीक विजेची स्पार्किंग होत असते. सदर रोहित्राकडे लक्ष देऊन वेलींचा विळखा काढून त्याच्या आजूबाजूला स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.