DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मारवड गावात औषधी वनस्पतींची लागवड.नेहरू युवा केंद्राचा अनोखा उपक्रम..

अमळनेर :- सामाजिक व खेळ मंत्रालय विभागांतर्गत नेहरू युवा केंद्र मार्फत मारवड या गावात औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ वनचरे
खूप पुरातन काळापासून आपले पूर्वज आपल्याला वेगवेगळ्या वनस्पतींपासून औषधी तयार करून ते आपला आजार बरा करत होते. आयुर्वेदिक वृक्षाचे मूळ खोड पान फूल सर्व अवयव उपयोगी असतात त्यापासून वेगळे औषधी बनवून धन्यवाद आजारामुळे त्याचा उपयोग होत असतो याचे महत्त्व लक्षात घेऊन मारवाड या गावामध्ये आयुर्वेदिक झाडांची लागवड करण्यात आली.यामध्ये २० वेगवेगड्या प्रकारचे आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करण्यात आली. गावातील प्रत्येक व्यक्तीने मोकळ्या जागेत आपल्या घरासमोर एक एक झाड लावून त्याचे संगोपन वाढवण्याची जबाबदारी घेतली. एकूण दीडशेहून अधिक वृक्षारोपण यामध्ये करण्यात आले.या वृक्ष रोपणाचा कार्यक्रमात मारवड गावाचे सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील महिला -युवक यामध्ये सहभागी होते. तसेच नेहरू युवा केंद्राच्या मेंबर देखील यामध्ये सहभागी होते.अमळनेर तालुका समन्वयक वैशाली दिपक पाटील यांनी नेहरू युवा केंद्र समाजातील प्रत्येक घटकाला घेऊन कशा पद्धतीने काम करते. याचे स्पष्टीकरण दिले तसेच आयुर्वेदिक वृक्षाचे उपयोग आणि महत्त्व देखील लोकांना पटवून दिले जेणेकरून लोक वनस्पती चे संवर्धन करतील.व त्याचा उपयोग होईल.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.