राज्यभरातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास लोकसंघर्ष मोर्चा चा जाहीर पाठिंबा…!!
अमळनेर:- सोमवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ पासून राज्यभरात परिवहन महामंडळ (ST) च्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनास आज रोजी लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर येथील पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी जाऊन श्रीमंता पासून ते गोर, गरीब, खेडया, पाड्यावर, राहणारे व्रुद्ध, महिला, सह सर्व जाती धर्माच्या प्रवाश्यांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय हक्कासाठी लढण्याची हिम्मत देत मार्गदर्शन करीत पाठिंबा दिला.
अमळनेर लोक संघर्ष मोर्चाच्या पदाधिकारींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.ना. उद्धवजी ठाकरे साहेब व परिवहन मंत्री मा.ना.अनिलजी परब साहेब यांना, एसटीची सेवा “प्रवाशांच्या सेवेसाठी” या ब्रिदवाक्यानुसार खेड्यापासुन शहरापर्यंत विस्तारलेली एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासुन शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी वर्गासाठी, मजुरांसाठी, वृद्धांसाठी, आणि महिलांसाठी एक हक्काची आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन आणि ग्रामिण जनतेसाठी जणु आत्मा म्हणजे एसटी होय. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा नारा होता “खेड्यांकडे चला’’ मात्र आधुनिक काळात शहर आणि खेड्यांची नाळ जोडुन ठेवण्याचे कार्य १९४८ या वर्षापासुन एसटीने केलेले आहे. एसटीचे एवढे महत्व असतांनासुद्धा एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करुन ऐन दिवाळीच्या वेळेत एसटीची चाके थांबली आणि अजुनही एसटी कर्मचाऱ्यांचा लढा सुरुच आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा चालु असलेला संघर्ष फक्त पगारवाढीसाठी नसुन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या फायद्यासाठी आहे कारण एसटी म्हणजे राज्यशासनासाठी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी आहे. करोडो लोकांचे एसटी हे प्रवासाचे साधन आहे आणि एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण झाल्यास…
१) १७ % असलेला प्रवासी कर रद्द होईल.
२) टोल टॅक्स द्यावा लागणार नाही अर्थात एसटीचे वर्षाकाठी ३५०० कोटी रुपये वाचतील.
३) महाराष्ट्र सरकारचा २७ % डिझेल कर रद्द होईल.
वरील पैसा वाचला म्हणजे तिकीट दरात जवळपास ४०% कपात होऊ शकते, सोमवार दिनांक ०८ नोव्हेंबर पासुन राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे, आणि त्यांच्या मागण्या रास्त आहेत, एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे, सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या समस्या थांबल्या पाहिजेत, त्यांच्या मुलाबाळांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, त्यांना चागले जगता यावे हा लोककल्याणकारी राज्याचा महत्वाचा घटक असतांना मात्र त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करुन गुन्हे दाखल करणे हा राज्यघटनेच्या लोककल्याणकारी राज्य निर्मिती या घटकाच्या विरोधी आहे याचा आम्ही तिव्र निषेध करीत आहोत.
त्यामुळे प्रवासी मायबाप जनता या महागाईच्या काळात जर एवढा पैसा वाचनार असेल शिवाय या सर्व कर्मचाऱ्यांना स्थिर जिवन जगता यावे यासाठी आपणही आपल्याला शक्य होईल त्या परीने शासन दरबारी एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरुन लढत आहेत त्यांना पाठिंबा द्यावा.
तरी मा.ना. मुख्यमंत्री सो. उद्धवजी ठाकरे साहेब व मा.ना. परिवहन मंत्री सो. अनिलजी परब साहेब यांनी या सर्व रास्त मागण्यांचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन लवकरात लवकर राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनातील सर्वच मागण्या मंजुर कराव्यात यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना लोकसंघर्ष मोर्चा पाठिंबा देत आहे, वेळ पडल्यास लोक संघर्ष मोर्चा ह्या आंदोलनात सक्रिय उतरेल. असा ईशारा देत पत्र दिले आहे. यावेळी लोक संघर्ष मोर्चा चे पन्नालाल मावळे सह प्रा. अशोक पवार सर, श्री बन्सिलाल भागवत गुरुजी, संदिप घोरपडे सर, रियाज शेख, संजय पवार, दयाराम पाटील, कलीम शेख, बालीक पवार, गणेश चव्हाण, शराफत अली, मुस्तफा भैया ए टू झेड, शेख कलीमोद्दीन हाजीजलालोद्दीन, रोशन मावळे सह पदाधिकारी कार्यकर्ते हजर राहून पाठिंबा दिला.