DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

राज्यात ओबीसीला आरक्षण लागू झाल्या बद्दल नवनिर्वाचित सरपंचानी माजी जलसंपदा मंत्री यांची घेतली भेट

जामनेर | शांताराम झाल्टे, उपसंपादक
आज रोजी महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा आमचे नेते श्री गिरीश भाऊ महाजन यांची सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र च्या व जळगाव जिल्ह्याच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.
राज्यामध्ये ओबीसी आरक्षण लागू केल्याबद्दल तसेच जनतेमधून थेट सरपंच निवड करणे याबाबतचे निर्णय नवनिर्वाचित भाजप शिवसेना सरकारने घेतल्याबद्दल सरपंच परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांची भेट घेऊन आभार मानले. या ठिकाणी उपस्थित जिल्हाध्यक्ष श्री बाळू भाऊ धुमाळ जिल्हा समन्वयक श्री श्रीकांत पाटील जामनेर तालुकाध्यक्ष श्री राजमल भागवत तालुका सचिव श्री युवराज पाटील व तालुका समन्वयक श्री बाळू चव्हाण तसेच सर्व पदाधिकारी व तालुक्यातील सर्व सरपंच उपस्थित होते.

बातमी शेअर करा !

 

Leave A Reply

Your email address will not be published.