राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्यात आणखी दोन दिवस पावसाळी स्थिती राहण्याची शक्यता आहे.
मागील काही तासात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे, तर राज्यातील अनेक काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. तर या जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.