रात्री झोपताना दुधासोबत ‘हे’ 2 पदार्थ मिसळून प्या ; ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी रामबाण उपाय
दिव्यसार्थी न्यूज नेटवर्क | मधुमेहाच्या रुग्णांसाठी त्यांची जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. डाइट प्लॅन फॉलो केला नाही तर रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. यामुळे अस्वस्थता, वारंवार लघवी, चक्कर येणे आणि जास्त तहान लागणे या दिसून येतात. मधुमेहाच्या रूग्णांमध्ये, यामुळे सुद्धा हार्टअटॅक, किडनी फेलियर आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
रोजच्या आहारात अशा अनेक गोष्टींचा समावेश केल्याने रक्तातील साखरेची पातळी (Blood sugar level) नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरतं. रक्तातील साखरे (Blood sugar) चे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी रोज रात्री दुधात हळद आणि दालचिनी टाकून पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.
पहिली गोष्ट म्हणजे दुधामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, झिंक, व्हिटॅमिन-डी आणि पोटॅशियम भरपूर प्रमणात असते. तज्ज्ञांच्या मते, दुधाचे सेवन करणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे पण दूध फॅट नसलेले असावं आणि जर तुम्ही ते दुधात दालचिनी किंवा हळद घालून प्यायले तर त्याचे फायदे दुप्पट होतात.
1.दूध आणि हळद : हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. यामध्ये फायबर, प्रोटीन,व्हिटॅमिन्स ,पोटॅशियम, कॅल्शियम, कॉपर,आयर्न , झिंक आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. एक ग्लास कोमट दुधात चिमूटभर हळद मिसळून पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तसेच तुमची रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होते.
2.दूध आणि दालचिनी : दालचिनीमध्ये भरपूर आयर्न , पोटॅशियम आणि व्हिटॅमिन्स असतात. रात्री झोपण्यापूर्वी दुधात दालचिनीची पावडर मिसळून पिऊ शकता. ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होईल.