DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी रत्नाकर जोहरे यांची नियुक्ती

जामनेर । उपसंपादक-शांताराम झाल्टे

आर.पी.आय(आ) पक्षाची कार्यकारिणी निवड संदर्भात महत्त्वाची बैठक सम्राट अशोक नगर बुध्दविहार मध्ये संपन्न करण्यात आली. असून जामनेर येथे भगवान भाऊ सोनवणे (युवा जिल्हा अध्यक्ष) जळगाव तथा स्वीकृत नगरसेवक यांच्या अध्यक्षतेखाली रत्नाकर भाऊ जोहरे यांची जामनेर तालुकाध्यक्ष पदी निवड कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत करण्यात आली . हिवरखेडे गावातील चांगले व्यक्तीमत्व असणारे रत्नाकर भाऊ जोहरे यांनी रिपब्लिकन चळवळीमधे धडपळीने काम करणारे कार्यकर्ते व जात पात न बघता सर्वांच्या सुख दुखात सहभागी होणारे तसेच सर्वांना सोबत घेऊन चालणारे कार्यकर्ते अशी ओळख असलेले एका ग्रामीण भागातील व्यक्तीची सर्वानुमते तालुका अध्यक्ष पदी आज रोजी निवड करण्यात आली. या बैठकी वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पक्षाचे युवा जिल्हा अध्यक्ष,तथा स्वीकृत नगरसेवक -भगवान भाई सोनवणे हे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत लोकशाही पध्दतीने तालुका,शहर कार्यकारिणी निवड करण्यात आली.

कार्यकारिणी पुढील प्रमाणे:-
★रत्नाकर जोहरे(तालुका अध्यक्ष-जामनेर),
★विक्रम बनसोडे(विधानसभा क्षेत्र प्रमुख,ता. जामनेर),
★जामनेर तालुका उपाध्यक्ष पदी-शेनफड सुरवाडे यादव सुरवाडे, अरुण घोरपडे, देवानंद इंगळे, किरण सुरवाडे, नितीन सपकाळे, रमेश सावळे, मंगल मोरे..
★ता.सचिव पदी- कैलास सुरळकर,
★ता.कार्याध्यक्ष पदी-हिम्मत शिंदे,
★सह सचिव- रवी तायडे,
★मुख्य संघटक- सुभाष अहिरे,
★गट प्रमुख- विनोद निकम,
★शहराध्यक्ष- प्रदिप लोखंडे,
★प्रमुख सल्लागार – अर्जुन रामोशे, पंडित सावळे.
तसेच★युवा तालुका अध्यक्ष – संतोष निकम
★ता.उपाध्यक्ष- दादाराव इंगळे, नितीन बनसोडे, सुनील लोखंडे, गोपाल सपकाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.पक्ष संघटन वाढीसाठी प्रामाणिकपणे काम करून तळागाळातील सर्व समाज बांधवांना मिळालेल्या जबाबदारी च्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करू अशी ग्वाही नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष-रत्नाकर जोहरे यांनी उपस्थितां समोर दिली.यावेळी निवड झालेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या..

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.