DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

वाळू चोरीस प्रतिबंध घालणाऱ्या वरील खोटे गुन्हे मागे घेऊन वाळू माफियांवर गुन्हे दाखल करा- सानेनगर वाशीयांची मागणी

अमळनेर | प्रतिनिधी:- नूर खान

येथील सानेनगर भागातील अवैध चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या मार्फत वाळू चोरीस प्रतिबंध करणाऱ्या वर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबतचे निवेदन स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना दिले

सानेनगर भागातील बोरी नदी पात्रात मोठया प्रमाणात झाडे-झुडपे, काटेरी झाडे हे मोठया प्रमाणात वाढलेली होती. त्यामुळे नदीच्या त्यापलीकडे शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठया कष्टाने
त्या झाडा झुडपांमधून वाट काढत जावे लागत होते. नदीची दुर्वास्था खूपच खराब होती. परंतू ग्रामस्थ व माजी आमदार साहेबराब पाटील, तसेच नगरपरिषद, अमळनेर यांच्या सहकार्याने नदीची साफसफाई करीत नदी पुर्नवस्थेत आणली.मात्र सानेनगर भागातून मोठया प्रमाणात अवैध वाळू चोरी होत असल्याने समस्त ग्रामस्थांचा बोरी नदी पात्रातील वाळू चोरीस विरोध केला जात आहे. परंतू वाळू चोरी करणारे व्यक्ती हे दांडपणा करतात त्यामुळे त्यांना वाळू चोरी करण्यापासून रोखणे शक्य होत नाही. परंतु याविरोधात भागातील रहिवाशी प्रविण सरदार साळुके हे नेहमी वाळू चोरी करणाऱ्या नां बेकायदेशीर वाळू वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी सतत
झटत असतात. त्यामुळे वाळू चोरी करणाऱ्या कडून त्यांचे विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यामध्ये खोटया तक्रारी देवून त्यांना फसविण्यात आले आहे व सानेनगर ग्रामस्थांचा वाळू चोरीस विरोध असतांना वाळू चोरी करणारे व्यक्ती दांडपणा करतात,तसेच प्रवीण साळुंखे वर खोटे आरोप करत गुन्हे दाखल करण्यात येत आहे. अश्याप्रकारे वाळू चोरी करणारे व्यक्तीकडून खोटे गुन्हे दाखल होत असतील तर वाळू चोरी करणारे व्यक्तींना मोठा दिलासा पोहचेल व त्यांना वाळू चोरण्यास वाव मिळेल.


वाळू चोरी करणाऱ्या कडून आपल्या पोलीस ठाणेस प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल न घेता उलट तपासणी करण्यात यावी. खोटया तक्रारींची सत्यता पडताळूनच गुन्हे दाखल करण्यात यावे, वाळू चोरी करणारे व खोटया माहिती देवून गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.अश्या आशयाचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने विनंती देण्यात आले आहे.

निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते प्रविण पाटील, माजी नगरसेवक भुरा आप्पा पाटील, रोहित पाटील सनी पाटील मच्छिंद्र पाटील संतोष पाटील भास्कर पाटील चेतन सनेर निलेश पाटील निखिल चव्हाण रवींद्र वाघ यासहअसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.