DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

चिंचोली पिंप्री येथे वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी

चिंचोली | प्रतिनिधी विश्वनाथ शिंदे

आज दि. ९ रोजी गृप ग्राम पंचायत चिंचोली पिंप्री येथे एकलव्य ह्या अदिवाशी महामानवाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. व यावेळी कार्यक्रमात क्रांती दिन सुद्धा साजरा करण्यात आला. ज्या महामानवानी आत्मबलीदान केल त्यांना सुद्धा श्रध्दांजली अर्पण करण्यात आली नुकत्याच मुक्ताईनगर तालुक्यातील विरजवानाला विरमरण झाले त्यांच्या  आत्मास शांती लाभो यासाठी दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली  वाहण्यात आली.

एकलव्य महामानवाच्या प्रतिमेचे पुजन माजी सरपंच . विद्यामान उपसरपंच विनोद चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले असता माजी सरपंच प्रकाश भुसारी यांच्या हस्ते नारळ फोडून पुष्प अर्पण केले . तसेच विद्यामान सरपंच सौ अरीफा तडवी यांचे पती शकलाल तडवी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी ग्रा.प सदस्य संदीप साळवे ,ग्रा.प. सदस्य पती निखिल तडवी ,अनिल दाभाडे, गावाचे कर्तव्य दक्ष पोलीस पाटील वसंत लोखडें ,सामाजिक कार्यकर्ते अण्णा पाटील, अर्जुन पाटील ,विश्वनाथ शिंदे ,रमेश सोनी, सत्तार तडवी,अरुण गायकावाड, माजी ग्रा.प सदस्य इन्सान तडवी ,दगडु जाधव, गजानन गायकवा,विकास म्हस्कर,इन्सान तडवी, निसार तडवी, बबन तडवी, मोहन महाजन,जगदीश आप्पा, सादीक तडवी, संदीप पाटील, सचिन पाटील , समस्त तडवी बांधव आणी गावातील नागरीकांनी एकलव्य ह्या आदिवाशी महामानव च्या प्रतिमेचे पुजन केले. या कार्यक्रमात पो.पा. वसंत लोखंडे यांनी एकलव्य न विषयी मार्गदर्शन केले. व सूत्रसंचालन आभार प्रदर्शन  विश्वनाथ शिंदे यांनी केले. तसेच मोठ्या उत्साहात एकलव्य ह्या महामानवाची जयंती साजरी करण्यात आली.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.