व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड, पॅनकार्ड अन् इतर कागदपत्रांचं काय करावं? जाणून घ्या..!
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सध्या आधार कार्ड आणि पॅनकार्ड ही दोन महत्वाची कागदपत्रे प्रत्येक ठिकाणी वापरली जातात. नोंदणीकरण आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठी आधार कार्डची आवश्यकता नसते, ही कुटुंबाच्या सदस्यांची जबाबदारी असते की त्यांनी मृत व्यक्तीचे आधार सुरक्षित ठेवावे.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर काय होते आधार कार्डचे?
कुठल्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे आधार कार्ड निष्क्रिय केले जात नाही, कारण अशी कोणतीही तरतूद नाही. तसेच मृत व्यक्तीचा आधार नंबर रद्द करण्याची कोणतीही व्यवस्था नाही आणि कोणतीही व्यवस्था बनवण्यात आलेली नाही, ज्या अंतर्गत आधार कार्ड परत घेता येऊ शकते. मात्र, ही जबाबदारी मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची आहे की, त्याचे आधार सांभाळून ठेवावे.
काय केले जाऊ शकते?
पुढील काळात या संस्थामध्ये आधार क्रमांक सामायिक करण्याची रूपरेखा तयार झाल्यानंतर रजिस्ट्रार मृताचा आधार नंबर निष्क्रि करण्यासाठी UIDAI सोबत सामायिक करण्यास सुरू करेल. आधार निष्क्रिय करणे किवां मृत्यू प्रमाणपत्रासोबत जोडल्याने आधार कार्डधारकाच्या मृत्यूनंतर याचा गैरवापर रोखता येऊ शकतो.
पॅनकार्डचे काय होईल?
पॅन कार्ड सरेंडर करता येऊ शकते. यासाठी मृत व्यक्तीचे नाव, पॅन आणि जन्म तारखेसह पॅन कार्ड सरेंडर करण्याचे कारण
त्याच्या मृत्यू प्रमाणपत्राच्या एक प्रतीसह द्यावे लागेल.
ज्यानंतर प्राप्तीकर विभागाची ई-फाइलिंग वेबसाइट हे
जाणून घेईल की तुम्ही हे कशासाठी जमा करत आहात. ही प्रक्रिया अनिवार्य नाही, तुम्हाला वाटले तर पॅनकार्ड तुमच्याकडेच सुरक्षित ठेवू शकता.