DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

शहरातून काढली सिंघम स्टाईलने गुंडयाची धिंड

अमळनेर प्रतिनिधी: नूर खान 

शहरातील सराईत गुन्हेगार हिट्रीशिटर शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख 23 वर्षे रा, संविधान चौक याचेवर अमळनेर पोलीस स्टेशन येथे शरीराविरुध्दचे तसेच मालमत्तेविरुध्दचे 23 गंभीर गुन्हे दाखल आहेत. शुभम उर्फ शियम उर्फ दाऊद मनोज देशमुख याने त्याचे साथी दारांसह दि. 01/11/2021 रोजी अमळनेर शहरातील श्री बालाजी स्टीलजवळ रोडवर एका इसमाला दमदाटी, मारहाण करुन त्याच्याकजुन बळजबरीने पैसे हिसकावून घेतल्याने आरोपी शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख व त्याचे साथीदाराविरुष्द अमळनेर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 480/2021 भादंवि कलम 394, 34 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. तेव्हापासुन शुभम उर्फ शिवम उर्फ दाद मनोज देशमुख हा फरार होता. तसेच दि. 10/12/2021 रोजी चाळीसगांव शहरात त्याचे इतर आठ साथीदारांसह एका इसमास मारहाण करून दरोडा टाकल्याने चाळीसगांव शहर पोलीस स्टेशन गुर नं.450/2021 भादंवि कलम 397, 427 प्रमाने दाखल गुन्ह्यात तो फरार आहे.

 दि. 02/02/2022 रोजी जिवनतारा हॉस्पीटल समोर संविधान चौक, अमळनेर येथे एका तो का इसमास दमदाटी करुन त्याच्याकडून बळजबरीने पैसे काढुन घेतले असल्याने अमळनेर पोलीस स्टेशन येथे त्याचेविरुध्द गु.र.नं. 59/2022 भादंवि कलम 392 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. तसेच दि. 02/02/2022 रोजी सायंकाळी07.30 वाजता आरोपी शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख हा अमळनेर शहरात आल्याची पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त माहीती मिळाली त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पोलीस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील यांचे सोबत पोहेकों सुनिल हटकर, पोना दिपक माळी, पोना मिलींद भामरे, पोना सुर्यकांत साळुखे, पोना रविंद्र पाटील, पोकॉ आमोल पाटील, पोकॉ राहुल पाटील, पोकॉ गनेश पाटील, पोकॉ रोहीदास आगोणे, पोकॉ सागर साढुंखे यांचे तीन पथक तयार केले तेव्हा शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख हा गलवाडे रोड प्रताप मिल कंपाऊंड येथे त्याची पत्नी व सासुकडे आल्याची गुप्त माहीती मिळाल्यावरुन त्यास पोलीस पथक पकडण्यास गेले असता त्याने पोलीसांना पाहुन पळ काढुन भिंतीवरून उडी मारली मात्र तो भिंतीवरून खाली पडला व त्याला पायाला दुखापत झाली तरी सुध्दा तो पळुन जात असतांना पोकॉ रोहीदास आगोणे , पोकॉ सागर साळूखे यांनी त्यास शिताफीने ताब्यात घेतले. 

त्यानंतर पोना मिलींद भामरे, पोना सुर्यकांत साळुखे यांनीही त्यास पकडण्यास मदत केली. तसेच सदर गुन्ह्यातील त्याचा साथीदार राहुल किशोर वानखेडे रा. लोग चारम ता. अमळनेर जि. जळगांव यास त्याचे राहते घरातुन दुस-या पथकातील पोना दिपक माळी, पोना रविंद्र पाटील, पोकॉ अमोल पाटील, पोकॉ राहुल पाटील यांनी ताब्यात घेतले. शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख हा सराईत गुन्हेगार असुन तो यापुर्वी 2018 मध्ये पोलीसांना हुल देवुन पळुन गेला होता. तो धोकादायक असल्याने मा, न्यायालयाकडुन त्यास हातकडी लावण्याची परवानगी घेतली. शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख हा अमळनेर शहरात स्वताला अमळनेरचा दाऊद समजतो व अमळनेर शहरातील व्यापा-याकडुन व नागरीकांकजुन बळजबरीने पैसे घेयुन जनतेच्या मनात दहशतीचे वातावरण पसरवितो. त्याची दहशत असल्याने सामान्य नागरीक व व्यापारी त्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देत नाहीत. जनतेच्या मनातील त्याच्याबद्दल भितीचे वातावरण कमी करण्याच्या उद्देशाने त्यात अमळनेर कोर्ट ते छत्रपती शाहु महाराज चौक असे पायी चालवत धिंड काढली.

या कारवाई न सर्व सामान्य जनतेला दिलासा मिळाल्याने नागरिकांनी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे व त्यांच्या टीमचे प्रत्यक्ष व मोबाईल द्वारे कौतुक करून अभिनंदन केले.

शुभम उर्फ शिवम उर्फ दाऊद मनोज देशमुख याचे बदल अमळनेर शहरातील लोकांनी भिती न बाळगता त्याने गुन्हा केला असल्यास त्याचेविरुध्य तक्रार द्यायी असे आवाहन अमळनेर पोलीस स्टेशनच्या वतीने जनतेला करण्यात येत आहे.

 

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.