DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

शासकीय कार्यालयात ओली पार्टी करणी भोवली ; ‘मजिप्रा’चे ते दोघे कर्मचारी निलंबित

जळगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र जीवन प्राधीकरण अर्थात मजिप्रा या विभागाच्या जळगाव येथील कार्यालयात टेबलावर मद्याची बाटली, ग्लॅस व सोबत चकणा ठेवून काही अधिकारी व कर्मचाऱ्यंनी ओली पार्टी रंगविल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, ओली पार्टी केल्याप्रकरणी पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर शाखा अभियंता आर. आर. ठाकूर व अनुरेखक हरचंद खंडू हजबन यांना निलंबीत करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नाशिक कार्यालयातील प्रमुख प्रशांत भामरे यांनी निर्देश जारी केले.

काय आहे प्रकरण :
जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात असलेल्या प्रशासकीय इमारतीमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयातील दालनात असलेल्या टेबलावर मद्याची बाटली, सोडा, चखणा असा साज करुन काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या पार्टीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे या कार्यालयात नुकतेच पालकमंत्री गुलाबराव पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सचिव किशोर राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत धुळे, नंदुरबार आणि जळगाव अशा तीनही जिल्ह्यांचे एकत्रित कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

 

याची दखल घेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कालच कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या नुसार आज चौकशी करण्यात आली असता मद्य प्राशन करणारी व्यक्ती ही शाखा अभियंता आर.आर. ठाकूर असल्याचे निष्पन्न झाले. तर त्यांच्या सोबत हरचंद खंडू हजबन हे अनुरेखक म्हणून काम करणारे असल्याचे दिसून आले.

या अनुषंगाने आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नाशिक कार्यालयातील प्रमुख प्रशांत भामरे यांनी निर्देश जारी करत मजिप्रा जळगाव कार्यालयाचे शाखा अभियंता आर.आर. ठाकूर व अनुरेखक हरचंद खंडू हजबन यांना निलंबीत करण्याचे आदेश काढले आहेत. निलंबनाच्या काळात ठाकूर यांना मजिप्रा उपविभाग कार्यालय नंदुरबार येथे हजेरी लावण्याचे बंधनकारक करण्यात आले आहेत. तर हजबन यांना एरंडोल येथे हजेरी लावण्याचे सांगण्यात आले आहे.

या दोन्ही जणांसोबत सेवानिवृत्त उपअभियंता टि.एस. गाजरे हे देखील ओल्या पार्टीत असल्याचे आढळून आले होते. त्यांना सहा महिन्यांसाठी करारावर घेण्यात आले होते. या प्रकरणानंतर त्यांचा करार रद्द करण्यात आला आहे. कार्यालयातच मद्य प्राशन करण्याच्या प्रकरणात थेट शाखा अभियंत्यालाच निलंबीत करण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.