DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

सुस्वागतं रामराज्यम्’ कार्यक्रमातुन नर्तन किर्तनाच्या सुरेल संगमाची अनुभूती

‘सुस्वागतं रामराज्यम्’ कार्यक्रमातुन नर्तन किर्तनाच्या सुरेल संगमाची अनुभूती

जळगाव दि.2 प्रतिनिधी – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आयोजित व जोशी बंधू ज्वेलर्स प्रायोजित’सुस्वागतं रामराज्यं’ या सुंदर नृत्य- नाटिकेद्वारे गुढी पाडव्याची संध्याकाळ रंगली. नर्तन-कीर्तनाचा सुरेल संगमाने जळगावकर रसिक मंत्रमुग्ध झाले. अयोध्यामधील रामजन्मोत्सव, जनकनगरीतील रामसीतास्वयंवर, विश्वामित्रासोबत असलेले गुरूशिष्याचे नाते, अयोध्यानगरीमधील राज्यभिषेकची तयारी, मंथरा कैकयीचे संभाषण, राम वनवास, भरतराम भेटीचा सोहळा, सीता अपहरण, राम रावण युध्द रामायणातील प्रत्येक क्षण अंगावर अक्षरशः रोमांचक निर्माण करीत होते. डॉ. भवरलाल व कांताबाई फाऊंडेशनचे सहकार्यातुन छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जोशी बंधू ज्वेलर्सचे अशोक जोशी, राम मंदिर संस्थानचे गादीपती ह.भ.प. श्रीराम जोशी, जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे अनिल जोशी, नृत्य नाटिका सादरकर्ते अक्षय आयरे, चांदोरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॕ.विवेकानंद कुलकर्णी, विश्वस्त शरद छापेकर, दीपक चांदोरकर उपस्थित होते. जोशी बंधू ज्वेलर्सचे अशोक जोशी, श्रीपाद जोशी, जैन इरिगेशनचे व्ही एम भट, डाॕ.विवेकानंद कुलकर्णी यांच्याहस्ते गुढी देऊन कलावंतांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. गीत रामायण कीर्तन आणि नर्तन, या दोन्ही भारतीय कला परंपरांचा संगम या नृत्य नाटिकेत श्रोत्यांना आनंद देऊन गेले. ‘भरत नृत्यम्’ ही नाट्य शास्त्रावर आधारित मार्गी नृत्यशैली रसिकांनी अनुभवी. दक्षिण भारतीय शास्त्रीय नृत्याची जोड असे आगळेवेगळे स्वरूप रसिकांना मोहिनी घातली. गीतरामायण अक्षय आयरे यांच्या संकल्पित व दिग्दर्शित केले असुन त्यांच्यासह पूजा भुर्के, लतिका पाटील, सनया बारस्कर, जान्हवी चारी, लाश्या पंडा, नम्रता शर्मा, मेधावी शर्मा, दिव्यश्री शर्मा, जाह्नवी तन्ना, आध्या भटनागर, चैताली शेट्टी , देवश्री गंभीर, साक्षी अय्यर, रुची बागवे, रुचिरा निंबरे, नेहा भोसले, स्नेहा वडके, स्नेहल तन्ना या शिष्यांचाही या सादरीकरणात समावेश होता. तांत्रिक सहाय्य, प्रकाश योजना रीमा आयरे आणि संगीत ध्वनीफित रमेश आयरे यांनी केले. सूत्रसंचालन दीपिका चांदोरकर यांनी केले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.