DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

स्वप्नील जोशी घेऊन येत आहे ओटीटी प्लॅटफॉर्म!

भारतीय प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर या प्लॅटफॉर्मवर दाखवले जाणार आहेत.

मोठ्या प्रमाणावर या प्लॅटफॉर्मवर दाखवले जाणार आहेत. लवकरच सुरु होत असलेले हे व्यासपीठ ‘भारताचे ओटीटी’ ठरणार असून त्यावर हिंदी, मराठी, बंगाली आदी प्रादेशिक भाषांमधील चित्रपट, वेब सीरिज, मालिका दाखविल्या जाणार आहेत.

स्वप्नील जोशी चित्रपट आणि मालिकांमधील भूमिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचला आहे. स्वप्नील जोशी त्याच्या ‘टामोरा डीजीवर्ल्ड’ या कंपनीच्या माध्यमातून एक ओटीटी व्यासपीठ घेऊन यावे, हा विचार गेल्या दीड वर्षांपासून करत होता, तर फिरोदिया हेसुद्धा मराठी, गुजराती आणि इतर भाषांमधील कार्यक्रमासाठी ओटीटी प्लटफॉर्म असावा यासाठी प्रयत्नशील होते. आता हे दोघेही एकत्र आले असून प्रेक्षकांसाठी स्वतःचे ओटीटी प्लॅटफॉर्म घेऊन येत आहेत.

याविषयी स्वप्नील म्हणाला, “एक कलाकार म्हणून काहीतरी वेगळे करायला हवे, असे मनात सतत घोळत होते आणि त्यातून ओटीटी व्यासपीठ सुरु करावे असा विचार गेली दीड वर्षे मनात होता. याच प्रक्रियेत मग ‘टामोरा डीजीवर्ल्ड’ या कंपनीची स्थापना झाली. त्यासाठी काही समविचारी मित्र एकत्र आलो. आम्हाला लोकांना एक चांगले ओटीटी व्यासपीठ द्यायचे होते. दरम्यानच्या काळात, या प्रकल्पाबद्दल मी नरेंद्र फिरोदिया यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांच्याबरोबर माझे गेल्या कित्येक वर्षांचे संबंध आहेत. त्यांची आणि माझी व्यवसाय महत्वाकांक्षा, तत्त्वे अशा सर्वचपातळ्यांवर वेव्हलेन्थ जुळते. ओटीटीबद्दल चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितले की त्यांनीही ‘लेट्सफ्लिक्स’ या ओटीटीची योजना आखली असून त्यावर ते प्रादेशिक भाषांमधील कार्यक्रम दाखवणार आहेत. आम्ही त्याबाबत चर्चा केली आणि त्यानंतर दोघांनीही एकत्र येण्याचे ठरवले. दोन्ही प्रकल्प एकत्र करून मोठ्या प्रमाणावर ओटीटी व्यासपीठ दाखल करायचे ठरले.”

स्वप्नील पुढे म्हणाला, ‘दोन मोठी नावे एकत्र येत असल्याने दाखल होणारा ओटीटी हा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सुरु होणार असून तो जागतिक स्तरावर कार्यरत असेल. केवळ भारतातील प्रादेशिक भाषाच नव्हे, पण अगदी परदेशी भाषांमधील कार्यक्रमसुद्धा पुढे जाऊन या व्यासपीठावर दाखल होणार आहेत. एक जागतिक स्तरावरील कंपनी सुरु होईल, या उद्दिष्टाने खूप चांगल्या लोकांचा चमू यासाठी एकत्र आला आहे. या उपक्रमाचे नाव काय असेल, त्याचा शुभारंभ कधी होईल, त्या सगळ्याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.”

स्वप्नील जोशी आणि नरेंद्र फिरोदिया

नरेंद्र फिरोदिया म्हणाले, “आम्ही हा ओटीटी भव्य प्रमाणावर दाखल करत आहोत. त्याचा फायदा सर्व भारतीय भाषांमधील कार्यक्रमांना होणार आहे. आमच्या प्रेक्षकांना भारतीय भाषांमधील दर्जेदार कार्यक्रम देण्याचा आमचा मानस आहे. हा खऱ्या अर्थाने ‘भारताचा ओटीटी’ असेल आणि आम्ही त्याच दृष्टीने नियोजन करत आहोत. या प्लटफॉर्मबद्दलची अधिक माहिती आम्ही लवकरच घोषित करणार आहोत.”

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.