DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

मराठी नंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणार सोनाली कुलकर्णी, ‘मलाइकोट्टाई वालिबान’ मधील लूक आला समोर

राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टाई वालिबान’ या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. यात सोनाली सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी  सध्या चर्चेत आह. तिच्या आगामी चित्रपट “मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी” मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर सध्या तिच्या नव्या लूकची चर्चा चालू आहे. हा लूक तिच्या आगामी मराठी चित्रपटातला नसून एका मल्याळम चित्रपटातील आहे. मराठी सिनेसृष्टीत आपलं अभिनय कौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नुकतचं तिनं तिच्या सोशल मीडिया अंकाऊटवरुन तिच्या नव्या चित्रपटाचं लूक शेअर केला आहे. ही मराठमोळी अभिनेत्री आता दाक्षिणात्य चित्रपटात आपलं नृत्यकौशल्य दाखवणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टाई वालिबान’  या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. यात सोनाली सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटातील एका गाण्याच्या माध्यमातून तिचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आला असून या फ्युजन लावणीत सोनालीची बहारदार अदा पाहायला मिळत आहे. आपल्या मनमोहक नृत्यदाकारीने सोनाली दक्षिणेतील प्रेक्षकांनाही घायाळ करणार असून महाराष्ट्राची ओळख असलेले लावणी नृत्य आता सोनाली दक्षिणात्य चित्रपटात गाजवणार आहे.

https://www.instagram.com/reel/C21PHkGpfbS/?utm_source=ig_embed&ig_rid=9276622c-1c8d-44a8-a5b7-e09d05ec7482

 

याबाबत सोनाली म्हणाली की, ” हा माझा पहिलाच मल्याळम चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटात अशा दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली, खूप आनंदाची गोष्ट आहे. आज या गाण्याच्या माध्यमातून माझ्या लूकवरील पडदा अखेर उठला आहे. जगभरात प्रदर्शित होणारा हा चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नड मध्ये २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे तर त्याच्या पुढील आठवड्यात हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट युके, युएस, कॅनडासह अनेक देशांमध्ये प्रदर्शित होणार असून कॅनडामध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला भव्य प्रादेशिक चित्रपट आहे. माझ्यासाठी हा एक खास अनुभव आहे. प्रेक्षक मला या नवीन व्यक्तिरेखेत स्वीकारतील, याची खात्री आहे.”

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.