DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

हर घर तिरंगा मोहीमे अंतर्गत गारखेडा बु! ग्रामपंचायत कडून तिरंगा झेंड्याचे वाटप

गारखेडा बु | प्रतिनीधी -सुनिल चौधरी
भारताच्या स्वातंत्र्याला ७५वर्ष पुर्ण होत असल्याने केंद्र शासनातर्फे या वर्षी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन यात १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज डौलाने फडकणार आहे.याचाच भाग म्हणून गारखेडा बु! ग्रामपंचायतीने हर घर तिरंगा मोहीमे अंतर्गत प्रत्येक तिरंगा झेंड्याचे वाटप करण्यात आले.
प्रत्येकाला १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आप आपल्या घर वर तिरंगा झेंडा लावून हे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करायचं आहे.
या ठिकाणी हर घर तिरंगा मोहीमे अंतर्गत गारखेडा बु! ग्रामपंचायत येथे सरपंच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक मनिष पाडळसे व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राठोड साहेब तसेच गावकरी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.