DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

१२ डिसेंबर २०२१ राशीभविष्य ; जाणून घ्या आजचा आपला दिवस कसा जाईल…!

मेष: अवांछित खर्च सामोरे येऊ शकतात. बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल.  डोळ्यांची काळजी घ्यावी. मनात नसत्या शंका आणू नका. मनाच्या चंचलतेला आवर घालावी.

 

वृषभ: आज विविध स्तोत्रातून लाभ मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. भावंडांसोबत दिवस मजेत घालवाल. मित्रांमध्ये तुमची प्रशंसा केली जाईल. आवडीची खरेदी केली जाईल.

 

मिथुन: कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम पहायला मिळतील. दिवसभर कामाची धांदल राहील. एकाचवेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. आर्थिक गणित सोडवता येईल. वरिष्ठ नवीन जबाबदारी देऊ शकतात.

 

कर्क: धार्मिक बाबीत रस घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मनातील समस्या दूर कराव्यात. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. धार्मिक स्थळाला भेट द्याल.

 

सिंह: जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. पोटाचे विकार संभवतात. मनातील भलत्या चिंता बाजूला साराव्यात. अचानक लाभाची शक्यता. त्रासदायक गोष्टींपासून लांब राहावे.

 

कन्या: जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. संध्याकाळी एखादे सरप्राइज मिळेल. भागीदारीत चांगला नफा मिळेल. जनसंपर्कात वाढ होईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

 

तूळ: इतरांच्या बोलण्याचा मनावर परिणाम होऊ शकतो. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. उगाचच चिडचिड होऊ शकते. आत्मविश्वास सोडून चालणार नाही. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे.

 

वृश्चिक: आजोळच्या नातेवाईकांची गाठ पडेल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस. आपले छंद जोपासावेत. प्रेमातील लोकांना एकत्र वेळ घालवता येईल. जुगारातून लाभ संभवतो.

 

धनू: कौटुंबिक जीवनात चांगले बदल होतील. घरातील ज्येष्ठांची सेवा करता येईल. अधिक वेळ घरगुती कामात घालवाल. वाहन खरेदीची इच्छा पूर्ण करता येईल. जवळचा प्रवास सुखाचा होईल.

 

मकर: आपल्यातील सकारात्मक ऊर्जेचा वापर करावा. रखडलेली कामे तडीस नेता येतील. लहान भावंडांचा हातभार लागेल. प्रेक्षणीय स्थळाला भेट द्याल. अचानक जुने मित्र भेटतील.

 

कुंभ: सांपत्तिक स्थिती सुधारेल. इतरांना बोलण्यातून जिंकू शकाल. घरात तुमच्या शब्दाला मान मिळेल. व्यापारी वर्ग खुश असेल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल.

 

मीन: आज लोक तुमच्यावर व्यक्तिमत्वावर आकर्षित होतील. विश्वासू मित्रांची साथ घ्यावी. आजचा दिवस मनाप्रमाणे घालवाल. लोकांवर तुमची चांगली छाप पडेल. प्रेमळपणे सर्वांच्या मनात घर कराल.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.