DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

१ नोव्हेंबरपासून गॅस सिलेंडर, बँका, रेल्वेच्या वेळापत्रकासह अनेक नियम बदलणार !

मुंबई | वृत्तसंस्था

ऑक्टोबर महिन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. सोमवारपासून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. या दरम्यान, असे अनेक बदल होत आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या जीवनावर होईल. पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेपासून देशभरात अनेक मोठे बदल होणार आहेत. देशभरात बँकिंग, घरघुती गॅस बुकिंगचे नियम तसेच रेल्वे क्षेत्रात बदल होणार आहेत. नेमकं १ नोव्हेंबरपासून काय बदल होणार आहेत जाणून घ्या.

  • १ नोव्हेंबरपासून बँकेत पैसे जमा करण्यापासून ते पैसे काढण्यापर्यंतच्या कामांसाठी शुल्क लागू शकते. म्हणजेच आता पैसे जमा करण्यासाठी देखील शुल्क भरावे लागेल. गॅस बुकिंगच्या नियमांमध्येही बदल होऊ शकतो. त्यासोबतच रेल्वेच्या टाइम टेबलमध्ये बदल होऊ शकतो.
  • १ नोव्हेंबरपासून भारतीय रेल्वे देशभरातील वेळापत्रकात बदल होणार आहे. १३ हजार प्रवासी ट्रेन आणि ७ हजार मालगाड्यांच्या वेळात बदल करण्यात आला आहे. एवढेच नाही तर, ३० राजधानी ट्रेन्सचे वेळापत्रक देखील बदलणार आहे.
  • १ नोव्हेंबरपासून घरघुती गॅसच्या किंमतींमध्ये बदल होऊ शकतो. LPG च्या किंमतींमध्ये वाढ केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार एलपीजीवर होणाऱ्या तोट्याला पाहता सरकार पुन्हा एकदा एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढवू शकते.
  • १ नोव्हेंबरपासून घरघुती गॅस सिलेंडरची डिलिवरी प्रक्रिया बदणार आहे. गॅस बुकिंगनंतर ग्राहकांना रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवण्यात येईल. तो डिलिवरी बॉयसोबत शेअर करावा लागेल. तो अचुक जुळल्यास गॅस सिलेंडरची डिलिवरी होऊ शकेल.
बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.