DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

तालुक्यातील संयुक्त क्षयरोग व कुष्ठरोगांच्या रुग्नांच्या तपासणी साठी घरोघरी जाऊन शोध मोहीमेला सुरूवात-वैद्यकिय अधिकारी डाॅ.राजेश सोनवणे

जामनेर/उपसंपादक-शांताराम झाल्टे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.तुषार देशमुख , जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.इरफान तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली १३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधितील संयुक्त क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहिमेला जामनेर तालुक्यात सुरुवात करण्यात आली असून या मोहिमे मध्ये आशा स्वयंसेविका प्रत्येक घरी जाऊन घरातील सर्व सदस्यांची तपासणी करीत आहेत. अशा मोहिमेत संशयित रुग्ण आढळून जर आल्यास त्यांचा छातीचा एक्स रे,थुंकी तपासणी तसेच इतर आवश्यक तपासणी मोफत करण्यात येईल आणि निदान झाल्यावर मोफत उपचार करण्यात येत आहे. त्या करिता शहरी भागात चार, ग्रामीण भागात दोनशे अठ्ठेचाळीस, एकूण दोनशे बावन्न, टीम नेमण्यात आल्या आहेत. यासंबंधी प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. व पर्यवेक्षणासाठी पन्नास आरोग्य पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरी भागातील ७०२६ , ग्रामीण भागातील ३१८७०, असे एकूण ३८८९६ नागरिकांची तपासणी मोहिमेत करण्यात येणार आहे. शोध मोहिमेत कुटुंबातील सर्व सदस्यांची कुष्ठरोग, क्षयरोग आजाराची माहिती देऊन तपासणी करण्यात आली आहे.यावेळी जर फिकट लालसर,न दुखणारा, न खाजणारा,बधिर चट्टा किंवा दोन आठवळ्यापेक्षा अधिक काळ खोकला, सायंकाळी वाढणारा ताप, वजन कमी होणे,रात्री येणारा तापासोबत घाम,थुंकीवाटे रक्त पडणे,सतत छातीत दुखणे,मानेजवळ लसीका ग्रंथींना सूज इतर लक्षणे असल्यास नागरिकांनी सर्वेक्षणाच्या वेळी उपस्थित रहाण्याचे आव्हान आरोग्य विभागाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे,डॉ.पल्लवी राऊत,डॉ.राजेश जैन,डॉ.मनोज पाटील,डॉ.दानिश खान,डॉ.संदीप कुमावत, डॉ.संदीप पाटील,डॉ.मोहितकुमार जोहरे यांनी केले. या मोहिमेसाठी कुष्ठरोग तंत्रद्य ई. पी.भोकरे ,क्षयरोग विभागाचे सुयोग महाजन ,आदि डॉ. परिश्रम घेत आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.