DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

नराधम बापानेच केले पोटच्या पोरी सोबत अश्लील कृत्य

पाचोरा | प्रतिनिधी

 

 

तालुक्यात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. बाप आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीला अश्लिल व्हिडीओ दाखवून असभ्य चाळे करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार मुकाट्याने सहन करणाऱ्या मुलीने अखेर कंटाळून किळसवाणे कृत्य करणाऱ्या बापाचे काळेकृत्य आईला सांगितले. या प्रकरणी पीडित मुलीच्याव आईच्या फिर्यादी वरून नराधम बापावर पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पाचोरा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांच्या प्राप्त माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील एका गावात पिडीत मुलगी ही तिची आई व वडीलांसह वास्तव्याला आहे. आई मोलमजूरी व बकऱ्या चारण्याचे काम करून संसार चालविते. पिडीत मुलगी ही अल्पवीन असून तीपण घरकामात मदत करीत असते.

 

नराधम बाप हा घरी कुणीही नसतांना मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ दाखवत होता. हा प्रकार गलिच्छ असला तरी बाप असल्यामुळे आणि त्याच्या धाकात मुलीने आतापर्यंत विरोध न करता सहन केले. दि.१३ सप्टेंबर रोजी सकाळी पिडीत मुलीची आई ही बकऱ्या चारण्यासाठी बाहेर गेली. त्यामुळे मुलगी घरी एकटीच होती.

 

दुपारी बकऱ्या चारून तिची आई घरी आल्यावर पिडीत मुलगी घराच्या कोपऱ्यात बसून रडत होती. ती रडत असल्याचे आईला समजल्यानंतर तिला रडण्याचे कारण विचारले. तिने आपल्यावर घडत सर्व प्रकार आईला सांगितला. मुलीसोबत घडत असलेला प्रकार एकूण तिच्या आईचा संताप अनावर झाला.

 

अखेर मुलीला सोबत घेऊन तिच्या आईने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेत पाचोरा पोलीस स्टेशनला सदर प्रकरणी गुन्हा दाखल करून नराधम बापाला पोलीसांनी अटक केली आहे. पोलीस उपअधिक्षक भरत काकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील पुढील तपास करीत आहे.

बातमी शेअर करा !

Leave A Reply

Your email address will not be published.