व्यवसायिक यांनी तहसीलदार यांना दिल निवेदन…स्वामी समर्थ मंदिराजवळ अत्याधुनिक ब्रेकर करा नाहितर आंदोलनाचा इशारा
(अमळनेर प्रतिनिधी- नूर खान) येथील स्वामी समर्थ मंदिराजवळ अत्याधुनिक ब्रेकर बसवले नाहीत यामुळे अपघात वाढत असून रस्ता तयार करतांना दुर्लक्ष झाले आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी प्रांताधिकारी, सार्वजनिक बांधकाम अभियंता, पालिका मुख्याधिकारी, आदींना याबाबत निवेदन दिले आहे. स्वामी समर्थ मंदिर प्रवेशद्वार या चौकालगत डी आर कन्या शाळा व जी एस हायस्कुल, इंदिरा गांधी शाळा, मुंदडा माध्यमिक विद्यालय अशा चार शाळेतील मुले रस्ता क्रॉस करतात याचा विचार न करता ब्रेकर बसवले गेले नाहीत काम सुरू असतांना शाळा कोरोनामुळे बंद होत्या.आता याठिकाणी चौफुली असतांना गोंधळ उडतो व अपघात प्रमाण वाढले आहे.
या भागात वाहतूक कोंडी उपद्रव वाढतच आहे. ज्यावेळी शाळा भरते आणि सुटते त्यावेळी पायी, सायकली घेऊन विद्यार्थी मोटारसायकल चालक त्यात हि तीन चाकी वाहने यामुळे वाहतुकीचे तीन तेरा होतात मोठा गोंधळ उडतो व यावेळी तीव्र वाहतूक ठप्प होते तब्बल 15 मिनिटे कोंडी सुरु असते याकडे कोणीही प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही ही शहराच्या दुर्दैवाची बाब आहे.यासाठी शाळेच्या मुलांचा विचार केला,तर ही समस्या सुटेल इतके निश्चित. रस्ता तयार करण्याआधी याठिकाणी ब्रेकर होते. त्यामुळे वाहने वेग कमी करत आता ट्रक मोटारसायकल आणि इतर वाहने या चौकात भरधाव येतात. आणि वाहतूक कोंडी प्रचंड होते यासाठी ब्रेकर बसवावे अन्यथा या भागातील व्यावसायिक आर पी भावसार, रोशन दाभाडे, पंकज चौधरी, उमाराज रसवंती, महेंद्र पाटील, दीपक पाटील, पतंजली आरोग्य केंद्र, माँ गायत्री ऑनलाईन सर्व्हिसेस, वर्षा मेडिकल, पद्मालय फोटो स्टुडिओ, चेतन जैन, दिलीप जैन, प्रकाश जाट, खंडू जैन, प्रितेश जैन, योगेश्वर डेअरी,रयत ऑनलाइन सर्व्हिसेस, दिव्या मोबाईल शॉप, शिवम बुक, शशिकांत पाटील, पंकज टायपिंग आदींनी निवेदन दिले असून याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास आंदोलन केले जाईल असा इशारा पत्रकात दिला आहे.