DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

स्पंदन २०२६ मध्ये गोदावरी नर्सिंग कॉलेजचा दमदार ठसा; विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश

जळगाव : दि. २३ ते २४ एप्रिल २०२६ दरम्यान महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय ‘स्पंदन २०२६’ युवा सांस्कृतिक महोत्सवात गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाचा गौरव वाढवला.

स्पॉट पेंटिंग स्पर्धेत (बीएस्सी नर्सिंग ८ वे सत्र) ऋतु भिलावेकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला. कार्टूनिंग स्पर्धेत वैष्णवी वाघमारे (७ वे सत्र) हिने तृतीय क्रमांक मिळवला, तर रांगोळी स्पर्धेत रजनींदिनी चव्हाण (८ वे सत्र) हिने द्वितीय स्थान पटकावले. स्पॉट फोटोग्राफी स्पर्धेत दिग्विजय बडे (७ वे सत्र) याने तृतीय क्रमांक मिळवून आपली छाप पाडली.

इन्स्टॉलेशन स्पर्धेत (समूह सहभाग) ७ व ८ व्या सत्रातील विद्यार्थ्यांनी एकत्रित सहभाग नोंदवत द्वितीय क्रमांक मिळवला. या गटात समीक्षा जवाडे, कल्याणी शहाणे, नम्रता घोडमारे आणि विकास जाधव यांचा समावेश होता.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, प्राचार्य डॉ. विशाखा गणवीर, उपप्राचार्य जस्मित दया, प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे तसेच शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.