जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा २०२६ उत्साहात
जळगाव – जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या अधिकृत मान्यतेने आणि जैन स्पोर्ट्स अकादमीच्या आयोजनातून झालेल्या जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा २०२६ उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडल्या. या स्पर्धा ३ ते ५ जुलै २०२६ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या.
स्पर्धांमध्ये ९, ११, १३, १५, १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी गटांसह पुरुष, महिला आणि ३५ वर्षांवरील पुरुष व महिला गटातील एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी अशा विविध प्रकारांचा समावेश होता. जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव आणि चोपडा या तालुक्यांतील एकूण १८३ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.

बक्षीस वितरण समारंभाला जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे खजिनदार व जैन स्पोर्ट्स अकादमीचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू वृषाली पाटील, प्रशिक्षक अतुल देशपांडे तसेच मुख्य पंच दीपिका ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत किशोर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना सुवर्ण व रौप्य पदके, क्रीडा साहित्य आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
स्पर्धेतील विजेते व उपविजेते
९ वर्षांखालील मुली एकेरी
विजेती – शनाया निलेश बोथरा
उपविजेती – अनुश्री विनोद पाटील
११ वर्षांखालील मुले एकेरी
विजेता – ऋत्विक प्रवीण खैरे
उपविजेता – अनय हेमंत पाटील
११ वर्षांखालील मुली एकेरी
विजेती – सुमिती ठाकूर
उपविजेती – तमन्ना सुरेश बसंदाणी
१३ वर्षांखालील मुले एकेरी
विजेता – दर्शिल राजकुमार मुनोत
उपविजेता – ऊर्जित उमेद रायसोनी
१३ वर्षांखालील मुली एकेरी
विजेती – तवास्मी वरुण मोहता
उपविजेती – आरोही धीरज माहेश्वरी
१३ वर्षांखालील मुले दुहेरी
विजेते – दर्शिल राजकुमार मुनोत व ऊर्जित उमेद रायसोनी
उपविजेते – मितांश गुप्ता व युवराज सुराणा
१३ वर्षांखालील मुली दुहेरी
विजेत्या – सर्वेशा संदीप जोशी व आरोही धीरज माहेश्वरी
उपविजेत्या – बाकी स्वप्निल कोठारी व लक्ष्मी प्रमोद पाटील
१५ वर्षांखालील मुले एकेरी
विजेता – भावेश सुनील पाटील
उपविजेता – अनामय अमोल जोशी
१५ वर्षांखालील मुली एकेरी
विजेती – तवास्मी वरुण मोहता
उपविजेती – स्निग्धा संजय पाटील
१५ वर्षांखालील मुले दुहेरी
विजेते – आरव अमित दुडवे व अनामय अमोल जोशी
उपविजेते – इंदर अग्रवाल व शिवा देवसरकर
१७ वर्षांखालील मुले एकेरी
विजेता – नैतिक राजेश शिंदे
उपविजेता – फाल्गुन राजेश पाटील
१७ वर्षांखालील मुली एकेरी
विजेती – ओवी अमोल पाटील
उपविजेती – पूनम ठाकूर
१७ वर्षांखालील मुले दुहेरी
विजेते – श्लोक विजय जगताप व फाल्गुन राजेश पाटील
उपविजेते – रजत प्रेमल पटेल व शंतनू शैलेश फालक
१७ वर्षांखालील मुली दुहेरी
विजेत्या – तवास्मी वरुण मोहता व पूनम ठाकूर
उपविजेत्या – अनिका अमित चौधरी व स्निग्धा संजय पाटील
१९ वर्षांखालील मुले एकेरी
विजेता – वैभव विलास परदेशी
उपविजेता – उदित कुशलकुमार मुंदडा
१९ वर्षांखालील मुले दुहेरी
विजेते – वैभव विलास परदेशी व हिमेश पाटील
उपविजेते – रजत प्रेमल पटेल व फाल्गुन राजेश पाटील
१९ वर्षांखालील मुली दुहेरी
विजेत्या – अनिका अमित चौधरी व स्निग्धा संजय पाटील
उपविजेत्या – मिहिका अमित राजपूत व सयुरी अमित राजपूत
१९ वर्षांखालील मिश्र दुहेरी
विजेते – फाल्गुन राजेश पाटील व तवास्मी वरुण मोहता
उपविजेते – उदित कुशलकुमार मुंदडा व अनिका अमित चौधरी
पुरुष एकेरी
विजेता – शुभम जितेंद्र चांदसरकर
उपविजेता – कौशिक प्रवीण बागड
महिला एकेरी
विजेती – वृषाली मिठाराम धांडे
उपविजेती – राधिका मुकुंद बऱ्हाटे
पुरुष दुहेरी
विजेते – कौशिक प्रवीण बागड व उमेर देशपांडे
उपविजेते – शुभम जितेंद्र चांदसरकर व चेतन शिवाजी वराळे
मिश्र दुहेरी
विजेते – कौशिक प्रवीण बागड व ओवी पाटील
उपविजेते – अंकित कोली व राजश्री पाटील
३५ वर्षांवरील पुरुष एकेरी
विजेता – तनुज शर्मा
उपविजेता – अमित दुडवे
३५ वर्षांवरील महिला एकेरी
विजेती – वृषाली मिठाराम धांडे
उपविजेती – अनिता ध्यानी
३५ वर्षांवरील पुरुष दुहेरी
विजेते – विनायक बालदी व कीर्ती मनोज
उपविजेते – अतुल ठाकूर व चेतन वराडे
३५ वर्षांवरील महिला दुहेरी
विजेत्या – सारंगा लोखंडे व वृषाली पाटील
उपविजेत्या – शीतल भोसले व प्राची माहेश्वरी
३५ वर्षांवरील मिश्र दुहेरी
विजेते – चेतन वराडे व वृषाली पाटील
उपविजेते – किशोर सिंह व अनिता ध्यानी
स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून दीपिका ठाकूर यांनी काम पाहिले. पंच म्हणून पूनम ठाकूर, शुभम जितेंद्र चांदसरकर, फाल्गुन पाटील, रजत पटेल, उदित मुंदडा आणि शंतनू फालक यांनी जबाबदारी सांभाळली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जैन स्पोर्ट्स अकादमीचे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण पाटील, देव वेद, अक्षय हुंडीवाले, श्लोक जगताप, जाजीब शेख, सुफियान शेख, कोनिका पाटील, देवदत्त अहिरे, नमन जैन, स्निग्धा पाटील आणि अंबिका साबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन किशोर सिंह सिसोदिया यांनी केले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन आणि सचिव विनीत जोशी यांनी अभिनंदन केले. तसेच विजेत्या खेळाडूंना आगामी महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा चषक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.