DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

आयआयटी, स्पर्धात्मक परीक्षांत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार

जळगाव : आयआयटी आणि इतर विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा महापौर कार्यालयाकडून मंगळवार, ७ जुलै रोजी गौरव करण्यात आला. महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते या सर्व विद्यार्थ्यांचा पुस्तक आणि पेन देऊन हृद्य सत्कार करण्यात आला.

महापौर कार्यालयात आयोजित या विशेष सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यात ईशान डहाके, अथर्व चव्हाण, सारंग वाणी, भक्ती मकवाना, प्रांजल चौधरी, मेघा सपकाळे या विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांच्या या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचाही याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.

यामध्ये शिक्षिका स्नेहल वाणी यांच्यासह इतर मार्गदर्शक शिक्षकांचा महापौरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना महापौर दीपमाला काळे यांनी, विद्यार्थ्यांनी भविष्यातही असेच यश संपादन करून देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, अशा शुभेच्छा दिल्या. या कौतुक सोहळ्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.