अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे वृक्षारोपण, फळ व शालेय साहित्य वाटप
जळगाव, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जळगाव जिल्हा व महानगर शाखेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी आकाशवाणी चौक येथील जिल्हा पक्ष कार्यालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील व महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर पक्षाच्या वतीने पक्ष कार्यालय परिसरात २१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. श्रीराम माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व दप्तरांचेही वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन व प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन यांनी केले. यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी, प्रदेश सरचिटणीस ईजाजभाई मलिक, जिल्हा समन्वयक विकासदादा पवार, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, माजी नगरसेवक राजुभाऊ मोरे, जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक सुनील भैय्या माळी, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गिरीश सांगळे वंजारी, सुहास चौधरी, संजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष मोहसीनभाई शेख, कार्यालय मंत्री सतीश चौव्हाण, फराह शेख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.