DIVYASARTHI NEWS
Just another WordPress site

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरुपौर्णिमा भक्तिभावाने साजरी

जळगाव : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण, भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी माजी खासदार तथा गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय डॉ. उल्हास पाटील यांना पुष्पगुच्छ अर्पण करून वंदन केले तसेच गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गुरुपूजनाने झाली. सूत्रसंचालनाची जबाबदारी आर्या आणि अरमान यांनी समर्थपणे पार पाडली. त्यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत कार्यक्रमाची प्रभावी सुरुवात केली. यावेळी दिया, ऐश्वर्या आणि देवराज यांनी गुरुंच्या महत्त्वावर मनोगत व्यक्त करत उपस्थितांना प्रेरणादायी विचार दिले. मधुरा आणि आशिष यांनी गुरुमहिमा अधोरेखित करणारी हृदयस्पर्शी कविता सादर केली, तर भावेश यांनी सुमधुर गुरुस्तवन गीत सादर करून सभागृहातील वातावरण अधिक भक्तिमय केले. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.

कार्यक्रमात उपस्थितांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत गुरुपौर्णिमेचे महात्म्य स्पष्ट केले. “गुरू म्हणजे ज्ञानाचा दीप, संस्कारांचा पाया आणि यशस्वी जीवनाची प्रेरणा” या विचाराला अनुसरून विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो आणि समाजोपयोगी कार्याची प्रेरणा मिळते, असे यावेळी वक्त्यांनी सांगितले. या प्रसंगी महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी गुरुजनांचा सन्मान करत ज्ञान, सेवा आणि संस्कारांची परंपरा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. उपस्थितांनी गुरुजनांप्रती आदर व्यक्त करत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान, सेवा, संस्कार आणि समर्पण या मूल्यांवर आधारित कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. शेवटी उत्कर्ष भोसले यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे “ज्ञान • सेवा • संस्कार • समर्पण” या मूल्यांचा वारसा जपत विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी, नैतिक मूल्ये आणि मानवी संवेदनशीलता रुजविण्यास सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

बातमी शेअर करा !
Leave A Reply

Your email address will not be published.